• Sun. Jun 7th, 2026

    Pune Water Cut: पुणेकरांवर पाणीकपातीचं संकट! आठवड्यात एक दिवस बंद किंवा दिवसाआड पुरवठ्याच्या पर्यायांचा विचार

    Pune Water Cut: पुणेकरांवर पाणीकपातीचं संकट! आठवड्यात एक दिवस बंद किंवा दिवसाआड पुरवठ्याच्या पर्यायांचा विचार

    Pune Water Cut: महापालिकेचे पाणीपुरवठा विभागप्रमुख नंदकिशोर जगताप यांनी सांगितले, की ‘पाणीकपातीचा निर्णय तातडीने घेणे शक्य नसल्याने नियोजनाच्या दृष्टीने दोन्ही पर्यायांचा अभ्यास सुरू आहे.

    पुणे पाणीपुरवठा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म.टा.प्रतिनिधी, पुणे: पुण्यावर पाणीटंचाईचे सावट अधिक गडद होत असून, आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवणे किंवा दिवसाआड पाणी देण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून तयार होत आहे. जलसंपदा विभागाने १५ टक्के पाणीकपात करण्याची सूचना पुणे महापालिकेला केल्यानंतर पाणीकपातीच्या प्रस्तावांना पाय फुटले असून, पुढील आठवड्यात त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

    महापालिका आयुक्तांच्या आदेशानंतर सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींशी चर्चा करून सर्वसाधारण सभेत पाणी कपातीबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. यंदा ‘एल निनो’च्या प्रभावामुळे पाऊस कमी पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे धरणांतील पाणीसाठा ३१ ऑगस्टपर्यंत टिकवून ठेवण्याच्या सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्या आहेत. या अनुषंगाने जलसंपदा विभागाने पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेला पुढील काही महिने १५ टक्के पाणीकपात करण्याची नोटीस बजावली आहे.’

    Maharashtra TimesPune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलीवर काकाचा अत्याचार, मोबाईल शूटिंग करणारी तक्रारदार मावशीच फिरली, पण पाच पुराव्यांमुळे 25 वर्ष तुरुंगवास
    या नोटीशीनंतर ‘पुणेकरांना पाण्याचा एक थेंबही कमी होऊ देणार नाही,’ अशी भूमिका स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी घेतली आहे, तर ‘पाण्याचे नियोजन करण्यासाठी उपाययोजना केल्या जातील,’ असे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी स्पष्ट केले आहे.

    पुणे शहराला खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांतून दररोज सुमारे १६०० ‘एमएलडी’ पाणीपुरवठा केला जातो. पावसाळा उशिरा सुरू झाल्यास उपलब्ध साठा टिकवून ठेवणे आव्हानात्मक ठरणार असल्याने आतापासूनच नियोजनावर भर देण्यात येत आहे. महापालिकेच्या अंदाजानुसार, आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवल्यास सुमारे १० टक्के पाण्याची बचत होऊ शकते, तर दिवसाआड पाणीपुरवठा केल्यास ही बचत २५ टक्क्यांपर्यंत जाऊ शकते. या दोन्ही पर्यायांतील तांत्रिक अडचणी आणि प्रत्यक्ष परिणामांचा सविस्तर अहवाल तयार करून आयुक्तांकडे सादर केला जाणार आहे.

    Maharashtra TimesPune Crime: प्रेमात अडथळा, जन्मदात्या आईनेच प्रियकराच्या मदतीने 6 वर्षीय मुलाला संपवलं, खेड तालुक्यातील घटना
    ‘स्काडा’द्वारे नियंत्रण
    शहरातील टँकर पाणीपुरवठ्यातील अनियमितता, अपघात आणि पाणीचोरीच्या घटनांवर अंकुश आणण्यासाठी महापालिकेने कडक पावले उचलली आहेत. टँकरमाफियांवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्याचा निर्णय घेतला असून, पाणीपुरवठ्याच्या संपूर्ण प्रक्रियेवर नजर ठेवण्यासाठी ‘स्काडा’ प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील ज्या भागांमध्ये पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा शक्य नाही, त्या ठिकाणी सध्या सुमारे ८१६ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. या व्यवस्थेसाठी महापालिका कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र, काही टँकरचालकांकडून महापालिकेकडून मोफत पाणी घेऊन त्याची अन्यत्र विक्री केल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि बेफिकीर वाहनचालनामुळे अपघातांची मालिकाही सुरू असून, महंमदवाडी परिसरातील अलीकडील अपघातानंतर हा मुद्दा अधिकच गंभीर ठरला आहे.

    प्रस्तावित कपात -१५ टक्के पुणे महानगरपालिका
    पर्याय -१ आठवड्यातून एक दिवस पाणीबंद
    पर्याय -२ दिवसाआड पाणीपुरवठा
    बचत -१० ते २५ टक्के
    पाणीस्रोत -खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर
    दैनंदिन वापर -१५६० दशलक्ष लिटर

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा