• Mon. Jun 15th, 2026

    Pune Metro: पुणे मेट्रोची क्षमता दुप्पट होणार! शहरात धावणार 6 डब्यांची मेट्रो; वाढत्या प्रवासी संख्येमुळे विस्ताराचा निर्णय

    Pune Metro: पुणे मेट्रोची क्षमता दुप्पट होणार! शहरात धावणार 6 डब्यांची मेट्रो; वाढत्या प्रवासी संख्येमुळे विस्ताराचा निर्णय

    Pune Metro Coaches: पुण्यात मेट्रोचे प्रवासी दिवसेंदिवस वाढत आहेत. यासाठी नव्या 12 ते 15 ट्रेन महामेट्रोच्या ताफ्यात दाखल होणार असून मेट्रोच्या डब्यांची संख्या तीन वरून सहा होणार आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म.टा. प्रतिनिधी, पुणे: पुणे मेट्रोच्या दोन मार्गिकांवर सध्या दिवसाला सरासरी दोन लाख प्रवासी प्रवास करीत असून, हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो कार्यान्वित झाल्यानंतर मेट्रो प्रवाशांची संख्या आणखी वाढणार आहे. सकाळी-सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत त्यात आणखी भर पडण्याची शक्यता गृहीत धरून मेट्रोच्या डब्यांची संख्या तीनवरून सहापर्यंत वाढविण्यासाठी ‘महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन’ने (महामेट्रो) तयारी सुरू केली आहे.

    सहा डबे करण्यासाठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम सुरू असून, भविष्यातील गरजा लक्षात घेऊन लवकरच त्याबाबतचा निर्णय घेण्याचे स्पष्ट संकेत ‘महामेट्रो’चे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी शुक्रवारी (१० एप्रिल) दिले.

    Maharashtra TimesMumbai Metro 5: भिवंडी शहरात पहिल्यांदाच धावणार मेट्रो, ठाणे-भिवंडी ‘मेट्रो लाइन 5’ला वेग; डेडलाइनही आली समोर

    ‘मेट्रोला होणारी सध्याची गर्दी लक्षात घेऊन विस्तारित मार्गिकांसाठी दोन टप्प्यांत अनुक्रमे १२ व १५ ट्रेन नव्याने दाखल होणार आहेत. त्याशिवाय, मेट्रोच्या डब्यांची संख्या तीनवरून सहापर्यंत वाढविण्यासाठी ‘अर्बन मास ट्रान्झिट कंपनी’ (यूएमटीसी) यांच्याकडून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून घेण्यात येत आहे,’ अशी माहिती हर्डीकर यांनी माध्यमांना दिली. मेट्रोच्या विस्तारित मार्गिकांसह टप्पा-२ मधील सर्वच मार्गांची कामे २०३० अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

    ‘महामेट्रो’ व ‘एसटी’त करार

    शिवाजीनगर येथील बस स्थानक उभारण्यासंदर्भात ‘महामेट्रो’ व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) यांच्यातील कराराचा मसुदा अंतिम झाला आहे. तो मसुदा एसटी महामंडळाच्या पुढील बैठकीत मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे. त्यानंतर शिवाजीनगर येथील एसटी स्थानकासाठी निविदा काढून त्याच्या पुढील कामाला गती देण्यात येणार आहे. या ठिकाणी एसटी स्थानक व बस पार्किंग उभारले जाणार आहे; तसेच पीपीपी तत्त्वावर जागेचा विकास केला जाणार आहे,’ असे हर्डीकर यांनी सांगितले.

    Maharashtra TimesMumbai Local: धावत्या ट्रेनमध्ये लटकून प्रवास आता होणार बंद, दरवाजे बंद होणारी लोकल झाली सज्ज; मुंबईकडे रवाना

    उत्पन्न-खर्चाचा ताळमेळ

    पुणे मेट्रोतून प्रवास करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत असून, गेल्या आर्थिक वर्षात मेट्रोच्या दोन्ही मार्गिकांवरून सात कोटी आठ लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. पुणे मेट्रोला केवळ तिकिटांतून ११२ कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. याशिवाय, तिकिटांशिवायच्या इतर उत्पन्न स्रोतांद्वारे (नॉन फेअर बॉक्स) २१ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे वर्षभरात १३३ कोटी रुपयांची भर मेट्रोच्या तिजोरीत पडली आहे. याच दरम्यान मेट्रोचा संचलन खर्च जवळपास १५० कोटी रुपये आहे. सरकारकडून मुद्रांक शुल्कावरील एक टक्का अधिभाराची रक्कम थेट कर्जफेडीसाठी वापरली जात असल्याने मेट्रोच्या हिशोबात ती धरण्यात येत नाही.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा