• Mon. Jun 15th, 2026

    Mumbai Local Ticket: ‘रेलवन’मुळे फुकट्यांची मजा! टीसी दिसताच तिकीट काढण्याची चलाखी; धावत्या एसी लोकलमध्ये सर्वाधिक घटना

    Mumbai Local Ticket: ‘रेलवन’मुळे फुकट्यांची मजा! टीसी दिसताच तिकीट काढण्याची चलाखी; धावत्या एसी लोकलमध्ये सर्वाधिक घटना

    RailOne App: यूटीएस ॲपवरून रेल्वे स्थानक परिसरात किंवा धावत्या ट्रेनमध्ये तिकीट काढणं शक्य नव्हतं. पण रेलवनमध्ये ही सुविधा उपलब्ध असल्यामुळे फुकटे याचा पुरेपूर फायदा घेत आहेत.

    म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: रेल्वे मंत्रालयाने ‘रेलवन’ ॲप अनिवार्य केल्यानंतर, आता या ॲपमधील त्रुटींमुळे रेल्वेच्या महसुलावर परिणाम होण्यास सुरुवात झाली आहे. उपनगरी रेल्वे गाड्यांमध्ये तिकीट तपासनीस दिसल्यानंतर, या ॲपवरून तिकीट काढण्याचे प्रकार प्रवाशांकडून घडत आहेत. या प्रकरणी मध्य रेल्वेने या ॲपची निर्मिती करणाऱ्या ‘सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टिम’ला (क्रिस) पत्र लिहून महिना उलटला. मात्र, अद्याप ‘क्रिस’ने याबाबत कारवाई केलेली नाही. परिणामी तिकीट तपासनीस आणि प्रवासी यांच्यात वाद उद्भवत आहेत.

    मराठी भाषेत कार्यरत असलेले यूटीएस बंद

    ‘महाराष्ट्र टाइम्स’ने ‘रेलवन’बाबतच्या तक्रारींचा मुद्दा सातत्याने लावून धरला आहे. मराठी भाषेत कार्यरत असलेले रेल्वेचे अधिकृत यूटीएस ॲप बंद करून १ मार्चपासून ‘रेलवन’ ॲप अनिवार्य करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. ‘रेलवन’ सुरू झाल्यापासून या ॲपबाबत प्रवाशांकडून तक्रारी सुरू आहेत. या ॲपमध्ये हजारो रुपये अडकल्याची लेखी तक्रारही प्रवाशांनी वाणिज्य विभागाकडे केली आहे. त्यातच, या नव्या तांत्रिक त्रुटीमुळे टीसींच्या अडचणीत भर पडली आहे.Maharashtra TimesPune Metro: पुणे मेट्रोची क्षमता दुप्पट होणार! शहरात धावणार 6 डब्यांची मेट्रो; वाढत्या प्रवासी संख्येमुळे विस्ताराचा निर्णय

    ‘रेलवन’ ॲपमध्ये आता धावत्या लोकलमध्ये तिकीट निघत असल्याने प्रवासी केवळ टीसी दिसल्यानंतरच तिकीट खरेदी करतात, अने अनुभवास आले आहे. विशेषत: एसी लोकलमध्ये असे प्रकार अनेकदा घडत आहेत. ॲपमधील तिकिट बुकिंगच्या वेळेवरून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अशा प्रकारची आतापर्यंत पाच प्रकरणे समोर आली आहेत. उपनगरी रेल्वेची प्रवासी संख्या लक्षात घेता, अशी अनेक प्रकरणे असण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही.

    एसी लोकलमध्ये वाढत्या घटना

    उन्हाळ्यामुळे प्रवाशांचा एसी लोकलमधून प्रवास करण्याचा कल वाढला आहे. एसी लोकलमध्ये एका डब्यातून दुसऱ्या डब्यात जाण्याची सुविधा आहे. यामुळे टीसीला पाहून प्रवासी पुढे जाऊन आपल्या मोबाइलमधील ‘रेलवन’ ॲपमधून तिकीट घेतात. याबाबतची सविस्तर माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे, असे वरिष्ठ तिकीट तपासनीसांनी सांगितले.

    Maharashtra TimesMumbai Local: धावत्या ट्रेनमध्ये लटकून प्रवास आता होणार बंद, दरवाजे बंद होणारी लोकल झाली सज्ज; मुंबईकडे रवाना

    ‘रेलवन’ ॲप अनिवार्य केल्यानंतर पहिल्याच आठवड्यात हा प्रकार समोर आला. ॲपमधून तिकीट घेण्यासाठी भौगोलिक अंतराची तांत्रिक मर्यादा (जिओ फेन्सिंग) नाही. यामुळे प्रवासी याचा गैरफायदा घेत केवळ टीसी दिसले, तरच तिकीट घेतात. यामुळे रेल्वे प्रशासनाची फसवणूक होतेच शिवाय त्याचा थेट परिणाम रेल्वेच्या महसूलावर होतो, असे ही रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा