• Sat. Jun 6th, 2026

    Pune Rain : ढग दाटून आले, गगनी काळोख संचारला, पुण्यात पावसाचा धुमाकूळ, जिकडेतिकडे पाणीच पाणी

    Pune Rain : ढग दाटून आले, गगनी काळोख संचारला, पुण्यात पावसाचा धुमाकूळ, जिकडेतिकडे पाणीच पाणी

    पुण्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक भागांमध्ये काळोख संचारलेला बघायला मिळतोय. पाऊस इतका मुसळधार पडतोय की, रस्त्यावर एक ते दीड फुटापर्यंत पाणी साचलं आहे. त्यामुळे या पाण्यातून मार्ग काढताना पुणेकरांना अडचणींना सामोरं जावं लागत आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पुणे : पुण्यात भर उन्हाळ्यात मुसळधार पाऊस पडताना बघायला मिळत आहे. वातावरणात झालेल्या बदलांमुळे पुण्यात पावसाचा प्रकोप बघायला मिळतोय. पुणे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसासह गारपीट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. विशेष म्हणजे पुणे शहरात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडताना दिसतोय. दोन दिवसांप्रमाणे आजही पुणे शहरात पावसाने धुमाकूळ घातलेला बघायला मिळत आहे. पुण्यात दुपारनंतर आजसुद्धा वातावरणात बदल झाला. पुणे शहरात विविध भागांत काळोख संचारलेला बघायला मिळाला. यानंतर ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरु झाला. या मुसळधार पावसामुळे दुचाकीस्वारांना अनेक अचडणींना सामोरं जावं लागलं. तसेच चारचाकी वाहनचालकांनाही गाडीचे लाईट लावून मार्ग काढावा लागत आहे.

    पुणे शहरातील अनेक भागांमध्ये काळोख बघायला मिळतोय. ढग दाटून आल्यामुळे हा काळोख निर्माण झाला आहे. तसेच मुसळधार पाऊस देखील पडत आहे. त्यामुळे रस्त्यावर फुटपाथच्या उंचीपर्यंत पाणी साचलं आहे. या परिस्थितीत रस्ता दिसावा यासाठी अनेक वाहनचालकांकडून लाईट लावून मार्ग काढण्यात येत आहे. रस्त्यावर एक ते दीड फूटापर्यंत पाणी भरलं आहे. पुणे शहरातील स्वारगेट, वारजे, शिवाजी नगर परिसर या ठिकाणी पाणी साचलं आहे. पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर पाणी साचलं आहे. तसेच शिवाजीनगर परिसरातही रस्त्यावर पाणी साचले आहे. ग्रामीण भागात काही ठिकाणी गारपीट झाली आहे. त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.

    Pune Heavy Rain

    हवामान विभागाचे शास्त्रज्ञ काय म्हणाले?

    हवामान विभागाचे तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी प्रतिक्रिया दिली. “गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यातील मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पाऊस पडत आहे. विदर्भात त्या मानाने कमी आहे. पण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस, वादळी वारे, विजांचा कडकडाट बघायला मिळतोय. दुपारच्या सुमारास असं वातावरण बघायला मिळतंय आणि ते संध्याकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत कायम राहतं. विंग डिस्कन्टीन्यूटी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अशाप्रकारे वातावरण निर्माण झालं आहे. पुढचे दोन ते तीन दिवस अशीच परिस्थिती असण्याची शक्यता आहे”, अशी माहिती के. एस. होसाळीकर यांनी दिली.”पुण्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून गारपीट होताना बघतोय. आजदेखील पुणे, सातारा, जुन्नर येथे अशा प्रकारचं वातावरण आपण पाहतोय. काही ठिकाणी गारपीट आणि काही ठिकाणी मुरसळधार पाऊस पाहायला मिळतोय. दुपारनंतर मेघगर्जनेसह पाऊस पडतोय. पुण्यात दुपारच्या वेळी सर्वसाधारणपणे 35 ते 36 डिग्री तापमान असतं. ज्यावेळी दोन तास पाऊस पडून जातो त्यानंतर संध्याकाळी तापमान हे 29 अंशावर येतं. तापमानात हा विलक्षण बदल आहे. हा बदल शरीरासाठी अपायकारक असू शकतील. काही संवेदनशील व्यक्ती असतील त्यांना त्याचा त्रास होऊ शकतो”, अशी प्रतिक्रिया होसाळीकर यांनी एका वृत्त वाहिनीला दिली.

    “शेतकऱ्यांनी ज्यावेळी अचानक अशाप्रकारे पाऊस पडेल तेव्हा पक्क्या घराच्या शेडमध्ये जावून त्यांनी राहावं. झाड आणि विजेच्या खांब्याजवळ त्यांनी थांबू नये. वादळी वाऱ्यामुळे उभ्या पिकांचं नुकसान होऊ शकतो. त्यामुळे त्यांची काळजी घ्यावी लागेल”, अशीदेखील प्रतिक्रिया हवामान विभागाचे तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिली.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा