• Sat. Jun 6th, 2026
    जीव देण्याआधी चिठ्ठीत भोंदूबाबा Ashok Kharatचं नाव, मग चार्जशीटमधून कसं गायब? युवकाच्या कुटुंबीयांची आता मोठी मागणी

    शिर्डीत 2022 मधील विकास दिवटे आत्महत्या प्रकरणात भोंदू अशोक खरात याचे नाव सुसाईड नोटमध्ये असूनही चार्जशीटमधून गायब झाल्याने खळबळ उडाली आहे. कुटुंबीयांनी फेरतपासाची मागणी केली असून पोलिसांच्या तपासावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

    जीव देण्याआधी चिठ्ठीत भोंदूबाबा Ashok Kharatचं नाव, मग चार्जशीटमधून कसं गायब? कुटुंबीयांचा संतप्त सवाल(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मोबीन खान, शिर्डी: चार वर्षापूर्वी शिर्डीतील एका तरूणाने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. विशेष म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी लिहलेल्या सुसाईड नोटमध्ये भोंदू अशोक खरात याच्यासह अनेक जण आत्महत्येस जबाबदार असल्याचं लिहलं होतं, असं असतानाही पोलीसांनी मात्र या भोंदूला क्लिनचीट दिल्याचं समोर आलं आहे. 2022 साली विकास दिवटे याने सासरचे लोक आणी भोंदू खरातच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती. फिर्यादीत या भोंदूचे नावं असतानाही न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या चार्जशिटमधून अशोक खरातचे नाव गायब झाले. यामुळे तात्कालीन पोलीस निरीक्षक आणि तपास अधिका-यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

    चिठ्ठीतून कारण सांगितले

    याबाबत, मयत विकासचे बंधू राजेंद्र रामदास दिवटे यांनी त्यावेळी शिर्डी पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भोंदू अशोक खरातसह मयत तरुणाचे सासरे , मेहुणा आणि साडू यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. भोंदू बाबाला अटक झाल्यानंतर राजेंद्र दिवटेदेखील मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर आले आहे. त्यांनी सांगितले ९ जून २०२२ रोजी माझा भाऊ विकास रामदास दिवटे यांनी पंख्याला लटकून जीव दिला.
    पंचनामावेळी त्याच्या मोबाईलच्या मागील बाजूस त्यांना एक चिठ्ठी दिसली. या चिठ्ठीमध्ये त्याने स्वतःला संवपयाचे कारण दिले होते. कॅप्टन खरात मयत आणि विकासचे सासरे ,मेहुना आणि साडू यांच्याकडून पैसे घेणे बाकी आहे. तसेच ते लोकं आणि अशोक खरात त्याला साई संस्था मधून काढून टाकण्याच्या धमक्या देत होते, असे राजेंद्र दिवटे यांनी सांगितले.

    Maharashtra TimesMaharashtra Cabinet Decisions : साकळाई योजनेला 1,234 कोटी, दिव्यांगांच्या शिष्यवृत्तीत मोठी वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत सहा महत्त्वाचे निर्णय

    पोलिसांनी सांगितलं…

    विकासच्या सासरवाडीतील लोकं भोंदू बाबाचे अंध भक्त होते. त्यामुळे त्यांनी भोंदू अशोक खरात याला मध्यस्थी टाकले होते. त्याच्या ओळखी असल्याने त्याने त्याच्या पावरचा वापर करून विकास यांना धमक्या दिल्या. पोलीस म्हणाले कॅप्टन खरात विरोधात आम्हाला काही पुरावे मिळाले नाही. त्यामुळे आम्ही दोषारोप पत्र सादर करू शकलो नाही. जर सुसाईड नोटमध्ये कॅप्टन खरातच नाव लिहिलेलं आहे. तर याच्यापेक्षा जास्त पोलिसांना अजून काय पुरावा पाहिजे? असा सवाल राजेंद्र यांनी उपस्थित केला.

    ‘प्रकरणाचा फेरतपास व्हावा’

    या प्रकरणात अनेक गोष्टी दाबल्या गेल्या. आम्ही सामान्य लोक असल्यामुळे लढा देऊ शकलो नाही, असे मयत विकास याचे भाऊ राजेंद्र दिवटे यांनी म्हटले असून या प्रकरणाचा फेर तपास व्हावा, अशी मागणी देखील राजेंद्र दिवटे यांनी केली आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. गेली तीन वर्षे पत्रकार म्हणून त्यांनी प्रत्यक्षपणे काम केलं आहे, ज्यामध्ये त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये (मुंबई) इंटर्न म्हणून पत्रकारिता सुरू केली.

    मेन डेस्क
    इंटर्न म्हणून रुजू झाल्यानंतर संबंधित संपादकांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडली. सहा महिने मेन डेस्कसाठी सर्व बीटच्या बातम्यांचे काम केले.

    फोटोगॅलरी, वेबस्टोरी
    तिथंच त्यांना फोटोगॅलरी आणि वेबस्टोरी या विभागात काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचे सोने करत त्यांनी अतिशय दर्जेदार काम केले. लोकसत्तामध्ये काम करताना, राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयावर सातत्याने बातम्यांचे लिखाण केल्याने त्यातील आवड खूप वाढली.

    शिक्षण
    सुनिल यांनी पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी बीए आणि एमएपर्यंतच शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पूर्ण केले आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी स्थानिक वृत्तपत्रांसाठी शैक्षणिक बीट सांभाळत बातम्या लिहल्या.

    जाहिरात क्षेत्रात काम
    याशिवाय सुनिल यांना फोटोग्राफी, व्हिडिओ संपादन, ग्राफिक्स डिझाइनचीही आवड आहे. या आवडीला जोपासण्यासाठी त्यांनी पत्रकारिता विभागाशी संबंधित असलेल्या जाहिरात या क्षेत्रात काम केले आहे. ही काम त्यांनी स्वतःच्या आनंदासाठी केले. ज्यातून त्यांचा मोठा जनसंपर्क वाढला. काही पैसेही मिळवता आले.

    दिग्दर्शन, संगीत
    कॉलेज जीवनात त्यांनी तीन लघुपट बनवले, ज्याचे कॅमेरा, पटकथा आणि दिग्दर्शनही त्यांनी स्वतःच केले आहे. त्यांना संगीत क्षेत्रातही खास रस आहे. काव्यलेखन, गीत लेखन, सादरीकरण केलेले त्यांचे व्हिडिओ युट्यूबवर व्हायरल झालेले आहेत.

    पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित
    दरम्यान, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये संधी मिळाल्यानंतर हायपर लोकल बातम्यांचे काम करण्याचा अनुभव मिळाला. ज्यामध्ये क्राइमसह विविध महत्वाच्या आणि मोठ्या बातम्या लिहायचेही तंत्र त्यांनी विकसित केले. मटा ऑनलाईनमध्ये काम करताना सुनिल यांची पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित झाला आहे, कारण इथेही सहकाऱ्यांचे सहकार्य आणि संपादकांचे, वरिष्ठांचे, शिफ्ट इन्चार्ज यांचे अनमोल मार्गदर्शन वेळोवेळी मिळत राहते. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनने पत्रकार म्हणून घडण्याची आणखी एक खूप मोठी सुवर्णसंधी दिल्याचे सुनिल मानतात.… आणखी वाचा