• Wed. Jul 22nd, 2026

    सायन येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jul 22, 2026
    सायन येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद – महासंवाद

    मुंबई, दि. २२ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिवस आणि दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून सायन येथील समाज मंदिर हॉलमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान झाले. या शिबिरात शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती देत पात्र लाभार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. रक्तदान व मोफत वैद्यकीय तपासणी शिबिरांचेही आयोजन यावेळी करण्यात आले.

    यावेळी आमदार कॅप्टन आर. तमील सेल्वन, मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल, अप्पर जिल्हाधिकारी बप्पासाहेब थोरात, निवासी जिल्हाधिकारी शिवनंदा लंगडापुरे उपस्थित होते.

    सायन कोळीवाडा हा गरीब घटकांचा मतदारसंघ असून येथे समाधान शिबिर आयोजित केल्याबद्दल आमदार कॅप्टन आर. तमील सेल्वन यांनी  प्रशासनाचे अभिनंदन केले. प्रास्ताविकात जिल्हाधिकारी गोयल यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र समाधान शिबिर’ हा उपक्रम लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान प्रशासन नागरिकांच्या दारी पोहोचवण्याचे प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले.  हक्कांबरोबरच नागरिकांनी आपली कर्तव्येही पार पाडली पाहिजेत, असे सांगत त्यांनी रक्तदान शिबिरात सहभागी होऊन पावसाळ्यात रक्तपेढ्यांतील तुटवडा कमी करण्याचे आवाहन केले. महिलांनी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी गोयल यांनी यावेळी केले.

    शिबिरामध्ये २९ शासकीय कार्यालयांनी सहभाग नोंदविला. त्यापैकी ९ विभागांमार्फत विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ देण्यात आला. एकूण ९१ लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे, शिधापत्रिका, क्रीडा साहित्य तसेच विविध योजनांतील लाभ वितरित करण्यात आले. २० विभागांनी नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती, अर्ज प्रक्रिया आणि मार्गदर्शन उपलब्ध करून दिले. समाधान शिबिरात सायन परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला असून, विविध योजनांसाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. आभारप्रदर्शन अप्पर जिल्हाधिकारी बप्पासाहेब थोरात यांनी केले.

    शिबिरासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलिसांचे सहकार्य लाभले. यावेळी वीर सावरकर ट्रस्टच्या वतीने विद्यार्थ्यांना सायकल तसेच दिव्यांग व्यक्तींना तीन चाकी सायकलचे वाटप करण्यात आले.

    0000

     

     

     

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed