• Thu. Jun 18th, 2026
    Pune Crime : नाईट ड्युटीला गेलेल्या आजीची नात अज्ञाताने संपवली; लाडक्या नातीसाठी धडपडणाऱ्या आजीवर आभाळ कोसळलं, आळंदीत भयानक घटना

    पिंपरी-चिंचवडच्या आळंदी परिसरात सहा वर्षीय चिमुकली आणि 75 वर्षीय महिलेची निर्घृण हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. अज्ञात आरोपीचा शोध सुरू असून, डॉग स्कॉड आणि फॉरेन्सिक पथक तपास करत आहे.

    नाईट ड्युटीला गेलेल्या आजीची नात अज्ञाताने संपवली; लाडक्या नातीसाठी धडपडणाऱ्या आजीवर आभाळ कोसळलं, आळंदीत भयानक घटना(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पिंपरी- चिंचवड, श्रीकृष्ण पांचाळ: पुण्यातील आळंदी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सहा वर्षीय चिमुकली आणि ७५ वर्षीय ज्येष्ठ महिलेची अज्ञात व्यक्तीने निर्घृण हत्या केल्याने परिसरात भीती आणि खळबळ पसरली आहे. धनश्री केदारी आणि संगीता शिंदे अशी मृतांची नावे आहेत. धनश्रीची आजी संगीता केदारी या रुग्णालयात हाऊसकीपिंगचे काम करतात. काल रात्री त्यांनी नात धनश्रीला शेजारी राहणाऱ्या संगीता शिंदे यांच्या घरी झोपायला सोडले होते. मात्र आज सकाळी त्या परत आल्यानंतर दोघींची हत्या झाल्याचे उघड झाले.

    डॉग स्कॉडच्या मदतीने आरोपीचा शोध

    अज्ञात व्यक्तीने बोथट हत्याराने हा खून केल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, अद्याप हत्येमागचे कारण स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळी पोलिस आणि फॉरेन्सिक पथक दाखल झाले असून, डॉग स्कॉडच्या मदतीने आरोपीचा मागोवा घेतला जात आहे. आरोपीच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.

    ‘आजच तिला पहिलीत घालायचं होतं…’

    दरम्यान, या घटनेनंतर धनश्रीची आजी संगीता केदारी यांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा आहे. ‘आजच तिला पहिलीत घालायचं होतं…’ असं सांगत त्या अश्रूंना वाट मोकळी करून देत आहेत. रात्रीदेखील ‘आई, तू रात्रपाळीला जाऊ नकोस, माझ्यासोबतच झोप’ अशी विनंती धनश्री करत होती, अशी हळवी आठवण त्यांनी सांगितली.

    Maharashtra Timesजीव देण्याआधी चिठ्ठीत भोंदूबाबा Ashok Kharatचं नाव, मग चार्जशीटमधून कसं गायब? युवकाच्या कुटुंबीयांची आता मोठी मागणी

    फाशीची मागणी

    संगीता केदारी यांचा मुलगा आणि सून त्यांच्यासोबत राहत नसल्याने त्या लहानपणापासूनच नात धनश्रीचा सांभाळ करत होत्या. मात्र या क्रूर घटनेने त्यांचं सर्वस्व हिरावून घेतलं आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अगदी फासावर लटकवावं, अशी मागणी त्यांनी पोलिस प्रशासनाकडे केली आहे. ‘

    महत्त्वाची बाब म्हणजे, संबंधित घराचा दरवाजा उघडा आढळला असला तरी कपाटातील मौल्यवान वस्तूंना हात लावलेला नाही. त्यामुळे चोरीच्या उद्देशाने ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी फेटाळला आहे. या दुहेरी हत्येमागचे नेमके कारण काय, याचा तपास सध्या पिंपरी-चिंचवड पोलीस करत आहेत.

    या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा