• Sun. Jun 7th, 2026
    Accident News : मुलाच्या लग्नाचं निमंत्रण देऊन परतताना वडिलांवर काळाची झडप, लग्नाच्या घरावर शोककळा

    अकोल्यातील मूर्तिजापूर येथे मुलाच्या लग्नाची पत्रिका वाटून परतताना भीषण अपघातात वडिलांचा मृत्यू झाला, तर एकजण जखमी झाला. ओव्हरटेक करताना दुचाकीचा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, या घटनेने लग्नाचा आनंद शोकात बदलला आहे.

    लग्नाच्या आनंदावर काळाची झडप; पत्रिका वाटून परतताना जावयाचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    प्रियंका जाधव, मूर्तिजापूर (अकोला) : मुलाच्या लग्नाचा आनंद असतानाच एका भीषण अपघाताने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. लग्नाची पत्रिका वाटप करून घरी परतणाऱ्या नवरदेव मुलाचे वडील आणि मामाचा दुचाकीचा भीषण अपघात झाला. यामध्ये वडिलांचा जागीच मृत्यू झाला असून मामा गंभीर जखमी आहे. ही दुर्दैवी घटना मूर्तिजापूर तालुक्यातील शिवाजीनगर परिसरात राज्य महामार्गावर घडली. शरद उत्तमराव डोंगरे आणि रमेश रामदेव जामनिक हे दोघे नातेवाईक (जावई- साला) मुलाच्या लग्नाची पत्रिका वाटण्यासाठी गेले होते. वाई गावावरून टिपटाळा या आपल्या गावाकडे दुचाकीने (क्रमांक MH 30 AS 4403) परतत असताना, शिवाजीनगर 6 जवळ त्यांनी समोर असलेल्या ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रयत्न त्यांच्या जीवावर बेतला आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला.

    एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

    या अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की, दुचाकीस्वार शरद उत्तमराव डोंगरे यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर त्यांचे सोबत असलेले रमेश रामदेव जामनिक हे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत तातडीने मदतकार्य सुरू केले. जखमी रमेश जामनिक यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

    परिसरात हळहळ

    दरम्यान, ज्या घरात लग्नाची लगबग आणि आनंदाचे वातावरण होते, तिथे या अपघाताच्या बातमीने दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे संपूर्ण मूर्तिजापूर तालुका आणि टिपटाळा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

    Maharashtra TimesMaharashtra Cabinet Decisions : साकळाई योजनेला 1,234 कोटी, दिव्यांगांच्या शिष्यवृत्तीत मोठी वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत सहा महत्त्वाचे निर्णय

    तपास सुरू

    सध्या या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू असून अपघाताची माहिती मिळताच मूर्तिजापूर शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. ओव्हरटेक करण्याच्या नादात हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. वाहतूक नियमांचे पालन न करणे किती जीवावर बेतू शकते, हेच या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. गेली तीन वर्षे पत्रकार म्हणून त्यांनी प्रत्यक्षपणे काम केलं आहे, ज्यामध्ये त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये (मुंबई) इंटर्न म्हणून पत्रकारिता सुरू केली.

    मेन डेस्क
    इंटर्न म्हणून रुजू झाल्यानंतर संबंधित संपादकांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडली. सहा महिने मेन डेस्कसाठी सर्व बीटच्या बातम्यांचे काम केले.

    फोटोगॅलरी, वेबस्टोरी
    तिथंच त्यांना फोटोगॅलरी आणि वेबस्टोरी या विभागात काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचे सोने करत त्यांनी अतिशय दर्जेदार काम केले. लोकसत्तामध्ये काम करताना, राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयावर सातत्याने बातम्यांचे लिखाण केल्याने त्यातील आवड खूप वाढली.

    शिक्षण
    सुनिल यांनी पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी बीए आणि एमएपर्यंतच शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पूर्ण केले आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी स्थानिक वृत्तपत्रांसाठी शैक्षणिक बीट सांभाळत बातम्या लिहल्या.

    जाहिरात क्षेत्रात काम
    याशिवाय सुनिल यांना फोटोग्राफी, व्हिडिओ संपादन, ग्राफिक्स डिझाइनचीही आवड आहे. या आवडीला जोपासण्यासाठी त्यांनी पत्रकारिता विभागाशी संबंधित असलेल्या जाहिरात या क्षेत्रात काम केले आहे. ही काम त्यांनी स्वतःच्या आनंदासाठी केले. ज्यातून त्यांचा मोठा जनसंपर्क वाढला. काही पैसेही मिळवता आले.

    दिग्दर्शन, संगीत
    कॉलेज जीवनात त्यांनी तीन लघुपट बनवले, ज्याचे कॅमेरा, पटकथा आणि दिग्दर्शनही त्यांनी स्वतःच केले आहे. त्यांना संगीत क्षेत्रातही खास रस आहे. काव्यलेखन, गीत लेखन, सादरीकरण केलेले त्यांचे व्हिडिओ युट्यूबवर व्हायरल झालेले आहेत.

    पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित
    दरम्यान, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये संधी मिळाल्यानंतर हायपर लोकल बातम्यांचे काम करण्याचा अनुभव मिळाला. ज्यामध्ये क्राइमसह विविध महत्वाच्या आणि मोठ्या बातम्या लिहायचेही तंत्र त्यांनी विकसित केले. मटा ऑनलाईनमध्ये काम करताना सुनिल यांची पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित झाला आहे, कारण इथेही सहकाऱ्यांचे सहकार्य आणि संपादकांचे, वरिष्ठांचे, शिफ्ट इन्चार्ज यांचे अनमोल मार्गदर्शन वेळोवेळी मिळत राहते. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनने पत्रकार म्हणून घडण्याची आणखी एक खूप मोठी सुवर्णसंधी दिल्याचे सुनिल मानतात.… आणखी वाचा