• Sat. Jun 6th, 2026
    Nanded Crime : ‘काका पेपर चांगला गेला बरं’; इंजिनिअर होण्याचं स्वप्न अधुरं, १९ वर्षीय तरुणीने आयुष्याची दोर कापली, कारण अस्पष्ट

    Nanded Young Girl End his Life : नांदेडमध्ये एक मोठी घटना समोर आली आहे. तंत्रनिकेतन महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका तरुणीने आपल्या आयुष्याची शेवट केली आहे. नातेवाईकांनी महाविद्यालय प्रशासनावर गंभीर आरोप केला आहे.

    नांदेड ग्रामीण तंत्रनिकेतन महाविद्यालय तरुणी आत्महत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अर्जुन राठोड, नांदेड : नांदेडमधील विष्णुपुरी परिसरातील ग्रामीण तंत्रनिकेतन महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका 19 वर्षीय विद्यार्थिनीचा वसतीगृहात गळफास घेतलेल्या अवस्थेत पार्थिव आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. आज बुधवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून ही तरुणी हिमायतनगर तालुक्यातील वाघी येथील रहिवासी होती.

    ‘पेपर चांगला गेला’

    मृत तरुणी ही ग्रामीण तंत्रनिकेतन महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक एन्ड टेलीकम्युनिकेशन शाखेच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. विशेष म्हणजे तिचा भाऊ देखील त्याच वर्गात शिक्षण घेत असल्याची माहिती आहे. महाविद्यालयात सध्या अंतर्गत परीक्षा सुरू आहेत. आज बुधवारी सकाळी ८ ते ९.३० या वेळेत तिचा पेपर होता. तिने पेपर पूर्ण केल्यानंतर आपल्या हॉस्टेलच्या मैत्रिणीसोबत ती वसतीगृहात गेली. आपल्या काकांना फोन करून ‘पेपर चांगला गेला’ अशी माहिती दिली होती. त्यानंतर ती आपल्या रूममधील मैत्रिणीसोबत काही वेळ फिरायला गेली. थोड्या वेळानंतर मैत्रीण जेवण करण्यासाठी गेली आणि काही वेळाने परत आल्यानंतर तिचं पार्थीव वसतीगृहात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आलं. ही घटना लक्षात येताच महाविद्यालय परिसरात एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी पार्थीव खाली उतरवून शासकीय रुग्णालयात नेलं. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
    Maharashtra TimesAccident News : मुलाच्या लग्नाचं निमंत्रण देऊन परतताना वडिलांवर काळाची झडप, लग्नाच्या घरावर शोककळा

    नातेवाईकांचा महाविद्यालय प्रशासनावर आरोप

    मृत तरुणी ही अत्यंत हुशार आणि अभ्यासू विद्यार्थिनी म्हणून ओळखली जात होती. अभियंता होण्याचं तिचं स्वप्न होतं. तिच्या अचानक मृत्यूमुळे मित्र-मैत्रिणींसह महाविद्यालयातील शिक्षकांमध्येही हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या घटनेनंतर नातेवाईकांनी महाविद्यालय प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. घटना घडल्यानंतर ही कुटुंबीयांना माहिती देण्यात आली नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. तसेच नातेवाईकांना कळवण्यापूर्वीच महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी पार्थीव खाली उतरवून रुग्णालयात हलविल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणात संशयाचं वातावरण निर्माण झालं आहे.
    Maharashtra TimesJalna News : रंग देताना आक्रित घडलं, ब्रशला विजेच्या तारेचा स्पर्श, शॉक लागून तरुणाचा अंत; पाच महिन्यांची चिमुकली पोरकी
    दरम्यान, आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. ग्रामीण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरु केला आहे. आहे. दरम्यान, या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या वसतीगृहातील विद्यार्थांच्या सुरक्षतेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा