• Sat. Jun 13th, 2026
    Jalna News : रंग देताना आक्रित घडलं, ब्रशला विजेच्या तारेचा स्पर्श, शॉक लागून तरुणाचा अंत; पाच महिन्यांची चिमुकली पोरकी

    Jalna News : जालना जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. एका नवविवाहित तरुणाचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनं संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.

    रंग देताना शॉक लागून तरुणाचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    योगेश काकफळे, जालना : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. रंगरंगोटीचं काम करत असताना उच्च दाबाच्या विजेचा शॉक लागून एका तरुणाचा करुण अंत झाला आहे. ही घटना अंबड-पाचोड रोडवरील शिरनेर येथे आज बुधवारी सकाळी सुमारे 11 ते 11:30 वाजण्याच्या दरम्यान घडली. मृत तरुणाचं नाव शुभम गणेश मुर्तडकर (रा. इंदिरा नगर, अंबड) असं आहे.

    रंगरंगोटीचं काम करताना विजेचा धक्का

    मिळालेल्या माहितीनुसार, शुभम मुर्तडकर हा रंगरंगोटीचं काम करण्यासाठी आपल्या चुलत्यासह व इतर सहकाऱ्यांसोबत शिरनेर येथे गेला होता. काम सुरू असताना तो पहिल्या मजल्यावरील पॅराफिट वॉलवर रंग देत होता. यावेळी त्याच्या हातातील लांब पाईप ब्रश अचानक घरासमोरील उच्च दाबाच्या विजेच्या तारेला लागला आणि क्षणार्धात त्याला जोरदार विजेचा धक्का बसला.
    Maharashtra TimesPune Crime : ‘मी डॉन आहे, मी बाप आहे’; खांद्यावर उचलत गुंडाची पुण्यात दहशतीचा प्रयत्न, रामनवमीला गाणी वाजवून डायलॉगबाजी

    पाच महिन्यांची लेक पोरकी

    घटनेनंतर त्याला तात्काळ अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र, उपस्थित वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्नील पाटील यांनी त्याला तपासून मृत घोषित केलं. या घटनेची माहिती अंबड पोलीस ठाण्यात देण्यात आली, पोलिसांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेत घटनास्थळी एक टीम पाठवली व घटनेची सखोल माहिती घेत चौकशी करून पंचनामा केला आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. मरणोत्तर पंचनामा पोलीस कर्मचारी संदीप कुटे, हिरामण फलटणकर आणि अमर तोडकर यांनी केला. मृत शुभम मुर्तडकर याच्या पश्चात पत्नी, पाच महिन्यांची मुलगी, एक मुलगा, आई-वडील, भाऊ-बहिण असा परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
    Maharashtra TimesMaharashtra Cabinet Decisions : साकळाई योजनेला 1,234 कोटी, दिव्यांगांच्या शिष्यवृत्तीत मोठी वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत सहा महत्त्वाचे निर्णय

    समृद्धी महामार्गावर भीषण अपघात

    जालना जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर आज बुधवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अत्यंत दुर्दैवी आणि भीषण अपघाताची घटना घडली आहे. जालन्यातील कडवंची शिवारात हा भीषण अपघात झाला असून, या अपघातात ६ महिला मजुरांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा