पोटच्या मुलाचा काटा काढण्यासाठी बापानेच रचलेला ७५ लाखांचा ‘डेथ प्लॅन’ ज्या एका पिस्तूलमुळे फसला, ते पुरवणारा मुख्य सूत्रधार अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. जंगली महाराज रोडवर भरदिवसा गोळीबाराचा प्रयत्न करून दोन वर्षे फरार असलेल्या निलेश गायकवाडला पुणे पोलिसांनी फिल्मी स्टाईलने बेड्या ठोकल्या.
स्नेहल निमगिरे, पुणे : पुण्यातील एका थरारक सुपारी किलिंग कटाला अखेर मोठं वळण मिळालं आहे. तब्बल दोन वर्षे फरार असलेला आणि शूटरांना पिस्तुल पुरवणारा सराईत गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. कौटुंबिक वादातून स्वतःच्या मुलालाच संपवण्यासाठी ७५ लाखांची सुपारी दिल्याच्या या प्रकरणाने शहर हादरलं होतं. या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी निलेश श्रीकांत गायकवाड (वय २४, रा. पिसोळी) असून, तो या कटातील महत्त्वाचा दुवा असल्याचे समोर आले आहे.
“तू आता वाचला रे…”
१६ एप्रिल २०२४ रोजी दुपारी जंगली महाराज रोडवरील कार्यालयाबाहेर बसलेल्या व्यावसायिक धीरज अरगडे यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी गोळीबार करण्याचा प्रयत्न केला होता. गाडीत बसून एसी सुरू केल्यानंतर त्यांनी काच खाली केली, इतक्यात मागे बसलेल्या आरोपीने पिस्तुल रोखून ट्रिगर दाबला. मात्र, गोळीच न झाडल्याने अरगडे थोडक्यात बचावले. घाबरून त्यांनी आरडाओरडा सुरू केला, तर “तू आता वाचला रे…” असे म्हणत आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
७५ लाखांची सुपारी
या घटनेनंतर गुन्हे शाखेने तपास हाती घेतला असता, धक्कादायक कट उघड झाला. धीरज अरगडे यांच्या वडिलांनीच कौटुंबिक वादातून मुलाच्या हत्येसाठी ७५ लाखांची सुपारी दिली होती. त्यापैकी २० लाख रुपये आधीच देण्यात आले होते, तर शूटरांना ५ लाख रुपये देण्यात आले होते. या कटात एकूण १० आरोपींचा सहभाग निष्पन्न झाला असून, त्यापैकी ६ जणांना आधीच अटक झाली होती.
Ahilyanagar News : ‘पप्पा आता हे सहन होत नाही’; मूल होत नाही म्हणून सासू-सासऱ्यांची अपमानास्पद वागणूक, 25 वर्षीय ऋतुजाने जीवनयात्रा संपवली
निलेश गायकवाडला अटक
दरम्यान, शूटरांना पिस्तुल पुरवणारा निलेश गायकवाड हा फरार होता. ३० मार्च रोजी काळेपडळ परिसरात पेट्रोलिंगदरम्यान पोलिसांना तो पिसोळी येथे आईला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्याला अटक करण्यात आली. चौकशीत त्याने गुन्ह्यातील सहभाग मान्य केल्याचे पोलिसांनी सांगितले.
या कारवाईमुळे सुपारी किलिंग प्रकरणातील महत्त्वाचा दुवा पोलिसांच्या हाती लागला असून, पुढील तपासात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. गेली तीन वर्षे पत्रकार म्हणून त्यांनी प्रत्यक्षपणे काम केलं आहे, ज्यामध्ये त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये (मुंबई) इंटर्न म्हणून पत्रकारिता सुरू केली.
मेन डेस्क इंटर्न म्हणून रुजू झाल्यानंतर संबंधित संपादकांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडली. सहा महिने मेन डेस्कसाठी सर्व बीटच्या बातम्यांचे काम केले.
फोटोगॅलरी, वेबस्टोरी तिथंच त्यांना फोटोगॅलरी आणि वेबस्टोरी या विभागात काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचे सोने करत त्यांनी अतिशय दर्जेदार काम केले. लोकसत्तामध्ये काम करताना, राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयावर सातत्याने बातम्यांचे लिखाण केल्याने त्यातील आवड खूप वाढली.
शिक्षण सुनिल यांनी पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी बीए आणि एमएपर्यंतच शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पूर्ण केले आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी स्थानिक वृत्तपत्रांसाठी शैक्षणिक बीट सांभाळत बातम्या लिहल्या.
जाहिरात क्षेत्रात काम याशिवाय सुनिल यांना फोटोग्राफी, व्हिडिओ संपादन, ग्राफिक्स डिझाइनचीही आवड आहे. या आवडीला जोपासण्यासाठी त्यांनी पत्रकारिता विभागाशी संबंधित असलेल्या जाहिरात या क्षेत्रात काम केले आहे. ही काम त्यांनी स्वतःच्या आनंदासाठी केले. ज्यातून त्यांचा मोठा जनसंपर्क वाढला. काही पैसेही मिळवता आले.
दिग्दर्शन, संगीत कॉलेज जीवनात त्यांनी तीन लघुपट बनवले, ज्याचे कॅमेरा, पटकथा आणि दिग्दर्शनही त्यांनी स्वतःच केले आहे. त्यांना संगीत क्षेत्रातही खास रस आहे. काव्यलेखन, गीत लेखन, सादरीकरण केलेले त्यांचे व्हिडिओ युट्यूबवर व्हायरल झालेले आहेत.
पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित दरम्यान, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये संधी मिळाल्यानंतर हायपर लोकल बातम्यांचे काम करण्याचा अनुभव मिळाला. ज्यामध्ये क्राइमसह विविध महत्वाच्या आणि मोठ्या बातम्या लिहायचेही तंत्र त्यांनी विकसित केले. मटा ऑनलाईनमध्ये काम करताना सुनिल यांची पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित झाला आहे, कारण इथेही सहकाऱ्यांचे सहकार्य आणि संपादकांचे, वरिष्ठांचे, शिफ्ट इन्चार्ज यांचे अनमोल मार्गदर्शन वेळोवेळी मिळत राहते. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनने पत्रकार म्हणून घडण्याची आणखी एक खूप मोठी सुवर्णसंधी दिल्याचे सुनिल मानतात.… आणखी वाचा