पोलीस दलाच्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी मोठे निर्णय घेतले आहेत. सी-६० जवानांना मेडल देण्यात येणार आहे, तसेच ड्रग्ज फ्री कॅम्पस मोहीम राबवण्याचंही ठरलं आहे आणि गुन्हे सिद्धीचा दर ९५ टक्क्यांवर नेण्यासाठी ‘एआय’चा वापर होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांचा पोलिसांसाठी मोठा निर्णय(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : महाराष्ट्रातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी आणि न्यायदानाची प्रक्रिया अधिक वेगवान करण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. “पुढच्या सहा महिन्यांत एफआयआर (FIR) पासून चार्जशीटपर्यंतची सर्व प्रक्रिया डिजिटल झाली पाहिजे,” असे निर्देश मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालकांना दिले आहेत. पोलीस दलाच्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
सी-६० जवानांचा गौरव
राज्यातील माओवादाचा धोका कमी करण्यात पोलीस दलाला मोठे यश आल्याचे सांगत फडणवीस यांनी पोलिसांचे अभिनंदन केले. “महाराष्ट्रातील माओवाद जवळपास संपुष्टात आला आहे. यासाठी २४४ पोलिसांनी बलिदान दिले आहे. ज्या जवानांनी ‘सी-६०’ (C-60) फोर्समध्ये किमान ३ वर्षे काम केले आहे, त्या सर्वांना ‘सी-६० मेडल’ देण्याचा निर्णय आज जाहीर करण्यात आला आहे,” असे त्यांनी सांगितले.
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर
गुन्हे तपासात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला जाणार आहे. “एविडन्स मॅनेजमेंट सिस्टीम (Evidence Management System) आता ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानावर नेली जाईल. ट्रायलपर्यंतच्या सर्व गोष्टी डिजिटल होतील. यासाठीची क्षमता आपल्याकडे आहे, फक्त ती सर्व पोलीस स्टेशनमध्ये राबवण्याची गरज आहे,” असे गृहमंत्री म्हणाले.
MHADA Lottery 2026 : म्हाडाच्या 2640 घरांसाठी आजपासून अर्ज सुरू; उत्पन्नानुसार कोणत्या गटाला किती घरं? महत्त्वाच्या तारखा जाणून घ्या
गुन्हे सिद्धीचा दर ९५ टक्क्यांवर नेण्याचे उद्दिष्ट
राज्यातील ‘कन्व्हिक्शन रेट’ (अपराध सिद्धीचा दर) सध्या ५० टक्क्यांच्या आसपास आहे, तो ९५ टक्क्यांपर्यंत नेण्याचे ध्येय सरकारने ठेवले आहे. यासाठी गेल्या ४-५ वर्षांतील ज्या केसेसमध्ये आरोपी सुटले, त्यांचे ‘एआय’च्या माध्यमातून विश्लेषण करण्याचे आदेश सीआयडीला (CID) देण्यात आले आहेत. तपासात कुठे त्रुटी राहिल्या, याचा अभ्यास करून नवीन धोरण आखले जाणार आहे.
‘ड्रग्ज फ्री कॅम्पस’ आणि रस्ते सुरक्षा
राज्यात ड्रग्जच्या विरोधात मोठी लढाई सुरू करण्याचा निर्धार फडणवीस यांनी व्यक्त केला. “ड्रग्ज फ्री कॅम्पस ही संकल्पना अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी पोलीस महासंचालक विशेष रणनीती तयार करणार आहेत. तसेच, नागपूर आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या धर्तीवर राज्यातील रस्ते अपघात कमी करण्यासाठी ‘सेफ्टी मॉडेल’ राबवले जाईल,” अशी माहिती त्यांनी दिली.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. गेली तीन वर्षे पत्रकार म्हणून त्यांनी प्रत्यक्षपणे काम केलं आहे, ज्यामध्ये त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये (मुंबई) इंटर्न म्हणून पत्रकारिता सुरू केली.
मेन डेस्क इंटर्न म्हणून रुजू झाल्यानंतर संबंधित संपादकांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडली. सहा महिने मेन डेस्कसाठी सर्व बीटच्या बातम्यांचे काम केले.
फोटोगॅलरी, वेबस्टोरी तिथंच त्यांना फोटोगॅलरी आणि वेबस्टोरी या विभागात काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचे सोने करत त्यांनी अतिशय दर्जेदार काम केले. लोकसत्तामध्ये काम करताना, राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयावर सातत्याने बातम्यांचे लिखाण केल्याने त्यातील आवड खूप वाढली.
शिक्षण सुनिल यांनी पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी बीए आणि एमएपर्यंतच शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पूर्ण केले आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी स्थानिक वृत्तपत्रांसाठी शैक्षणिक बीट सांभाळत बातम्या लिहल्या.
जाहिरात क्षेत्रात काम याशिवाय सुनिल यांना फोटोग्राफी, व्हिडिओ संपादन, ग्राफिक्स डिझाइनचीही आवड आहे. या आवडीला जोपासण्यासाठी त्यांनी पत्रकारिता विभागाशी संबंधित असलेल्या जाहिरात या क्षेत्रात काम केले आहे. ही काम त्यांनी स्वतःच्या आनंदासाठी केले. ज्यातून त्यांचा मोठा जनसंपर्क वाढला. काही पैसेही मिळवता आले.
दिग्दर्शन, संगीत कॉलेज जीवनात त्यांनी तीन लघुपट बनवले, ज्याचे कॅमेरा, पटकथा आणि दिग्दर्शनही त्यांनी स्वतःच केले आहे. त्यांना संगीत क्षेत्रातही खास रस आहे. काव्यलेखन, गीत लेखन, सादरीकरण केलेले त्यांचे व्हिडिओ युट्यूबवर व्हायरल झालेले आहेत.
पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित दरम्यान, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये संधी मिळाल्यानंतर हायपर लोकल बातम्यांचे काम करण्याचा अनुभव मिळाला. ज्यामध्ये क्राइमसह विविध महत्वाच्या आणि मोठ्या बातम्या लिहायचेही तंत्र त्यांनी विकसित केले. मटा ऑनलाईनमध्ये काम करताना सुनिल यांची पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित झाला आहे, कारण इथेही सहकाऱ्यांचे सहकार्य आणि संपादकांचे, वरिष्ठांचे, शिफ्ट इन्चार्ज यांचे अनमोल मार्गदर्शन वेळोवेळी मिळत राहते. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनने पत्रकार म्हणून घडण्याची आणखी एक खूप मोठी सुवर्णसंधी दिल्याचे सुनिल मानतात.… आणखी वाचा