• Sat. Jun 6th, 2026

    Neelam Gorhe : ‘भोंदूंना भेटण्याचे संस्कार माझ्यावर नाहीत, खरात नावाच्या व्यक्तीला भेटल्याचे आरोप कपोलकल्पित’; नीलम गोऱ्हे यांची प्रतिक्रिया

    Neelam Gorhe : ‘भोंदूंना भेटण्याचे संस्कार माझ्यावर नाहीत, खरात नावाच्या व्यक्तीला भेटल्याचे आरोप कपोलकल्पित’; नीलम गोऱ्हे यांची प्रतिक्रिया

    “अशोक खरातला मी कधीही भेटले नाही, हे सर्व आरोप कपोलकल्पित असून माझ्याविरुद्ध रचलेले विषारी षडयंत्र आहे,” अशा शब्दांत विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी तृप्ती देसाईंच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.

    नीलम गोऱ्हे यांनी तृप्ती देसाईंचे आरोप फेटाळले(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावर नाशिक येथील एका हॉटेलमध्ये अशोक खरात नावाच्या व्यक्तीची भेट घेतल्याचा खळबळजनक आरोप केला होता. या आरोपांना आता नीलम गोऱ्हे यांनी प्रत्युत्तर दिले असून, हे सर्व आरोप ‘कपोलकल्पित’ आणि आपली राजकीय प्रतिमा मलीन करण्यासाठी रचलेले ‘षडयंत्र’ असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

    ‘माझी कारकीर्द स्वच्छ आणि पारदर्शी’

    आपल्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करत नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, “मी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात नेहमीच सक्रिय राहिले आहे. आमदार होण्यापूर्वीपासून मी माझे प्रत्येक काम पत्रकाद्वारे जनतेसमोर मांडत आले आहे. माझी तत्त्वे आणि कामाची पद्धत मी कधीही कोणापासून लपवलेली नाही. माझी संपूर्ण कारकीर्द जनतेसमोर एका उघड्या पुस्तकाप्रमाणे पारदर्शी आहे.”

    ‘ढोंगी बुवाबाजीवर माझा विश्वास नाही’

    नीलम गोऱ्हे पुढे म्हणाल्या की, “माझे आजोबा स्व. ॲड. श्रीपाद देशपांडे, आई लतिकाताई आणि वडील डॉ. दिवाकर गोरे यांनी माझ्यावर आधुनिक संस्कार केले आहेत. गेल्या पाच दशकांत मी कधीही कोणत्याही ढोंगी बुवा किंवा गुरूच्या दर्शनाला गेलेली नाही. माझी अढळ श्रद्धा केवळ देवदेवता, अक्कलकोटचे स्वामी समर्थ, साईबाबा आणि दत्त महाराजांवर आहे. मंत्रिपद मिळवण्यासाठी मला कधीही तांत्रिक गुरूची गरज भासली नाही.”

    Maharashtra TimesEknath Khadse : एकनाथ खडसे आणि त्यांच्या ज्येष्ठ कन्येवर गुन्हा दाखल, अडचणी वाढणार? खडसेंची पहिली प्रतिक्रिया

    ‘नाशिकमधील भेटीचा दावा पूर्णतः खोटा’

    तृप्ती देसाई यांनी केलेल्या आरोपांचं खंडण करताना त्या म्हणाल्या, “नाशिक येथील ‘एक्सप्रेस इन’ हॉटेलमध्ये मी खरात नावाच्या व्यक्तीला सहा-सात वर्षांपूर्वी किंवा इतर कोणत्याही कारणासाठी भेटले, या वृत्ताचा मी स्पष्टपणे आणि नि:संदिग्धपणे इंकार करते. अशा प्रकारच्या बातम्या पूर्णतः काल्पनिक आहेत. यात लवलेशही सत्य नाही.”

    ‘राजकीय द्वेषातून विषारी षडयंत्र’

    या आरोपांमागे राजकीय हेतू असल्याचे सांगत त्यांनी नमूद केले की, “उपसभापतीपद आणि मंत्रिपदाचा दर्जा मिळाल्यामुळे काही मोजक्या व्यक्तींमध्ये माझ्याबद्दल द्वेष निर्माण झाला आहे. नुकत्याच झालेल्या अधिवेशनातील माझे संसदीय कार्य आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी केलेली माझी प्रशंसा काही हितशत्रूंना सहन झालेली नाही. विशेषतः पुणे महानगरपालिकेत ज्यांना अपयश आले, असे काही असंतुष्ट घटक माझ्याविरुद्ध हे विषारी षडयंत्र रचत आहेत.”

    अधिवेशनात मौन का पाळले?

    अधिवेशनादरम्यान या विषयावर का बोललो नाही, याचे स्पष्टीकरण देताना त्या म्हणाल्या, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची एसआयटी चौकशी १३ मार्चलाच जाहीर केली होती. २३ तारखेला जेव्हा ही बातमी आली, तेव्हा मी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहत होते. अधिवेशन सुरू असताना मी यावर भाष्य करणे म्हणजे चौकशीत हस्तक्षेप ठरला असता. कारण चेअरवरून केलेले भाष्य हे सरकारला निर्देश असतात. म्हणूनच मी अधिवेशनापर्यंत संयम राखला आणि २६ तारखेला माझी भूमिका स्पष्ट केली.”

    तृप्ती देसाईंचे आरोप

    “शिवसेना शिंदे गटाच्या आमदार आणि उपसभापती नीलम गोऱ्हे गेले पाच ते सहा वर्षे अशोक खरात याच्याकडे जात होत्या. त्यांना विधान परिषदेवर आमदारकी हवी होती. इतर वेळेस नीलम गोऱ्हे अनेक गोष्टींवर बोलतात. आता अशोक खरातवर का बोलत नाहीत? याचं कारण नीलम गोऱ्हे यांचे अशोक खरातसोबत चांगले संबंध होते”, असा खळबळजनक आरोप सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केला होता.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. गेली तीन वर्षे पत्रकार म्हणून त्यांनी प्रत्यक्षपणे काम केलं आहे, ज्यामध्ये त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये (मुंबई) इंटर्न म्हणून पत्रकारिता सुरू केली.

    मेन डेस्क
    इंटर्न म्हणून रुजू झाल्यानंतर संबंधित संपादकांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडली. सहा महिने मेन डेस्कसाठी सर्व बीटच्या बातम्यांचे काम केले.

    फोटोगॅलरी, वेबस्टोरी
    तिथंच त्यांना फोटोगॅलरी आणि वेबस्टोरी या विभागात काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचे सोने करत त्यांनी अतिशय दर्जेदार काम केले. लोकसत्तामध्ये काम करताना, राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयावर सातत्याने बातम्यांचे लिखाण केल्याने त्यातील आवड खूप वाढली.

    शिक्षण
    सुनिल यांनी पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी बीए आणि एमएपर्यंतच शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पूर्ण केले आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी स्थानिक वृत्तपत्रांसाठी शैक्षणिक बीट सांभाळत बातम्या लिहल्या.

    जाहिरात क्षेत्रात काम
    याशिवाय सुनिल यांना फोटोग्राफी, व्हिडिओ संपादन, ग्राफिक्स डिझाइनचीही आवड आहे. या आवडीला जोपासण्यासाठी त्यांनी पत्रकारिता विभागाशी संबंधित असलेल्या जाहिरात या क्षेत्रात काम केले आहे. ही काम त्यांनी स्वतःच्या आनंदासाठी केले. ज्यातून त्यांचा मोठा जनसंपर्क वाढला. काही पैसेही मिळवता आले.

    दिग्दर्शन, संगीत
    कॉलेज जीवनात त्यांनी तीन लघुपट बनवले, ज्याचे कॅमेरा, पटकथा आणि दिग्दर्शनही त्यांनी स्वतःच केले आहे. त्यांना संगीत क्षेत्रातही खास रस आहे. काव्यलेखन, गीत लेखन, सादरीकरण केलेले त्यांचे व्हिडिओ युट्यूबवर व्हायरल झालेले आहेत.

    पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित
    दरम्यान, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये संधी मिळाल्यानंतर हायपर लोकल बातम्यांचे काम करण्याचा अनुभव मिळाला. ज्यामध्ये क्राइमसह विविध महत्वाच्या आणि मोठ्या बातम्या लिहायचेही तंत्र त्यांनी विकसित केले. मटा ऑनलाईनमध्ये काम करताना सुनिल यांची पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित झाला आहे, कारण इथेही सहकाऱ्यांचे सहकार्य आणि संपादकांचे, वरिष्ठांचे, शिफ्ट इन्चार्ज यांचे अनमोल मार्गदर्शन वेळोवेळी मिळत राहते. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनने पत्रकार म्हणून घडण्याची आणखी एक खूप मोठी सुवर्णसंधी दिल्याचे सुनिल मानतात.… आणखी वाचा