• Tue. Jun 16th, 2026

    Pune PMP Bus: पुण्यात ‘पीएमपी बस’च्या ॲपमुळे तिकीट बुकिंग सोपं, 1 एप्रिलपासून प्रशासनाचा उपक्रम; काय आहेत वैशिष्ट्ये?

    Pune PMP Bus: पुण्यात ‘पीएमपी बस’च्या ॲपमुळे तिकीट बुकिंग सोपं, 1 एप्रिलपासून प्रशासनाचा उपक्रम; काय आहेत वैशिष्ट्ये?

    PMP Bus App: पीएमपी बसच्या आपली पीएमपीएल ॲपमुळे प्रवाशांना मोठा फायदा होतो आहे. तिकीट बुकींगसह अनेक सुविधांमुळे प्रवासात वेळ वाचतो. यासाठी प्रशासन ॲप ड्राइव्ह सुरू करणार आहेत.

    पुणे: पुण्यात पीएमपी बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी पीएमपीने आपलं अॅप सुरू केलं आहे. या अॅपच्या आधारे प्रवाशांना अनेक सुविधा उपलब्ध होतात. परंतु, अनेक प्रवशांना याबद्दल माहिती नसल्यामुळे पीएमपी प्रशासनाकडून 1 एप्रिलपासून विशेष मोहीम सुरू केली जाणार आहे. यामध्ये अधिकाधिक प्रवाशांना तिकीट बुकिंगसाठी अॅप वापरण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल.

    कसा होईल फायदा?

    पीएमपीच्या प्रमुख बस स्टॉपवर बसच्या आतमध्ये, सीट शेजारी, आणि बाहेर पॅनेवलवर क्यूआर कोड लावले जाणार आहेत. यामुळे प्रवाशांना हे अॅप वापरण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल. या अॅपचा वापर करून बस स्टॉपवर थांबलेल्या प्रवाशांना तिकीट खरेदी करण्यापासून बसचे रिअल टाइम लोकेशन आणि संपूर्ण वेळापत्रकाची माहिती प्रवाशांना सहजपणे मिळते. सध्या 2.5 दशलक्षाहून अधिक प्रवासी या अॅपचा वापर करतात. परंतु, ही संख्या प्रवाशांपेक्षा कमी असल्यामुळे अॅपवापर करणाऱ्यांची संख्याही वाढवण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.Maharashtra TimesPune Metro: शुक्रवार पेठेत मेट्रो बोगद्याला छिद्र पडून पाणी गळती, महापालिकेकडून कठोर पावले; सुरक्षेसाठी नियमावली जाहीर करणार

    पीएमपीचे अध्यक्ष आणि संचालक महेश आव्हाड यांनी याबद्दल माहिती दिली, “Aapli PMPML हा अॅप प्रवाशांसाठी अत्यंत फायदेशीर ठरत आहे. सार्वजनिक वाहतुकीच्या आधुनिकरणाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. सध्या 2.5 दशलक्षाहून अधिक प्रवासी अॅपचा वापर करत असून ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढवण्याचे आमचे लक्ष्य आहे.”

    काय आहेत वैशिष्ट्ये?

    हा अॅप प्रवाशांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून सोयीस्कर ठरत आहे. बसची वाट पाहत असतानाच तिकीट बुक केल्यामुळे पुन्हा कंडक्टरवर अवलंबून राहवं लागत नाही. शिवाय प्रवाशांच्या वेळेतही बचत होते. शहरांतील नवीन प्रवाशांना बसच्या वेळापत्रकासह त्यांच्या मार्गांचीही माहिती सहजपणे मिळते. तसेच, बसच्या लाइव्ह ट्राकिंगमुळे घरातून किती वाजता निघाल्यावर कोणती बस मिळेल हे समजणे शक्य होते. या अॅपमुळे पुणेकरांना आपल्या प्रवासाचं योग्य नियोजन करणं शक्य झालं असून प्रवासाच्या वेळेत बचतही होत आहे.

    Maharashtra TimesKalyan-Dombivali AC Bus: कल्याण-डोंबिवलीकरांचा गारेगार प्रवास थांबला! शहरातील एसी बससेवा बंद; संपूर्ण उन्हाळा प्रवाशांना फटका

    एप्रिल महिन्यापासून सुरू केलेल्या या अॅप ड्राइव्हनंतर अॅपवापरकरत्यांची संख्या वाढून पुण्यातील प्रवास अधिक हाय-टेक होईल अशी प्रशासनाची अपेक्षा आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा