Ladki Bahin Yojana February Installment Update: मंत्री तटकरे यांनी समाजमाध्यमातून यासंदर्भात पोस्ट करत माहिती दिली. लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातील रक्कम एकत्र दिल्या जाणार असल्याच्या चर्चा या अखेर वावड्याच ठरल्या आहेत.
राज्य सरकारने फेब्रुवारी महिन्यातील हप्ता वितरीत करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यासंदर्भात मंत्री तटकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे.
Melghat Malnutrition: कुपोषण ही शोकांतिका! माता-बालमृत्यूंबाबत उच्च न्यायालयाकडून तीव्र खेद व्यक्त
पुढील दोन ते तीन दिवसांत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात हा सन्मान निधी जमा होणार आहे. महायुती सरकारचा दृढ निश्चय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर या योजना अशीच सुरू राहणार’, असा विश्वासही तटकरे यांनी व्यक्त केला.
कथित व्हायरल व्हिडिओ प्रकरणी झिरवाळांचा मुख्यमंत्र्यांना फोन, फडणवीसांनी सगळं सांगितलं
आकड्यांपलीकडे काय मिळाले?
महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची निरंतरता मिळाली; पण निवडणूकपूर्व २,१०० रुपयांपर्यंत वाढीचे आश्वासन या अर्थसंकल्पातही पूर्ण झाले नाही. २५ लाख महिलांना लखपती दीदी बनवण्याचे उद्दिष्ट आणि ग्रामीण पशुधन उद्योगांवर विशेष भर दिला गेला आहे. उमेद मॉलचा १३ जिल्ह्यांत विस्तार, एकल महिला धोरणासाठी सर्वेक्षण आणि ग्रामीण भागातील महिलांसाठी विशेष पशुधन योजना यामुळे महिला अर्थव्यवस्थेत अधिक सहभाग वाढेल, अशी आशा निर्माण झाली आहे. तथापि, या योजनांचा थेट लाभ सामान्य महिलांपर्यंत कितपत पोहोचेल, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. ग्रामीण विकास आणि पायाभूत सुविधांवरही अर्थसंकल्पाने लक्ष केंद्रित केले आहे.
