Kurla-Ghatkopar Flyover: सध्या कुर्ला ते घाटकोपर प्रवास करताना लाल बहादूर शास्त्री मार्गावरून जावं लागतं. या मार्गावर घाटकोपर रेल्वे स्थानक, AGLRसह संत नरसी मेहता रोडचं जंक्शन असून सायंकाळी मोठ्या प्रमाणात कोंडी होऊन प्रवासाचा वेळ वाढतो.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: कुर्ला ते घाटकोपर प्रवास करताना लाल बहादूर शास्त्री मार्गावर प्रचंड वाहतूककोंडी होते. पूर्व मुंबईतील सर्वाधिक कोंडी असलेल्या मार्गांपैकी हा एक आहे. या मार्गासाठी पर्याय म्हणून महापालिकेने कुर्ला ते घाटकोपरदरम्यान 4.25 किमी लांब उड्डाणपुलाचं काम हाती घेतलं आहे. बीएमसीकडून या पुलाचं बांधकाम सध्या सुरू आहे.
अनेक प्रवाशांना पर्यायी मार्ग
सध्या एलबीएस मार्गावर अनेक ‘बॉटलनेक’ आहेत. सकाळी व सायंकाळी पीक अव्हरदरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. या जंक्शनवर अंधेरी घाटकोपर लिंक रोड, घाटकोपर रेल्वे स्थानक व संत नरसी मेहता रोड या मार्गांवरून येणारे प्रवासी प्रवास करत असल्यामुळे चोक पॉइंट तयार होतो. यामुळे या सर्व मार्गांवरील प्रवासी त्रस्त आहेत. हा नवीन उड्डाणपूल तयार होताच प्रवाशांना या चोक पॉइंट आणि जंक्शवर न जाता, पर्यायी मार्ग मिळणार आहे. तसेच, अंधेरी-घाटकोपर लिंक रोडवरी प्रवाशांसाठीही हा पर्यायी उन्नत मार्ग उपलब्ध होणार आहे.Mumbai-Ahmedabad Bullet Train: बुलेट ट्रेनच्या मार्गावर 25 पैकी 17 नदीपूल तयार, ‘बीकेसी’मध्ये भूमिगत स्थानकाचं काम सुरू; कसा असेल मार्ग?
कसा असेल मार्ग?
कुर्ला ते घाटकोपर उड्डाणपुलामुळे प्रवासाचा वेळ केवळ 10 मिनिटांवर येणार आहे. 3-4 किमीचे अंतर असले तरी कोंडीच्या वेळी कुर्ला ते घाटकोपर जाताना अर्धा तास लागतो. नव्या उड्डाणपुलामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. हा नवीन उड्डाणपूल 4.25 किमी लांब असून याचा प्रमुख भाग 3.91 किमी लांब असेल. शिवाय कुर्ल्याच्या दिशेने 146 मीटरच्या रॅम्पसह घाटकोपरच्या दिशेने 180 मीटरचा रॅम्प असेल. हा उड्डाणपूल चार पदरी असणार असून मुंबईकरांना मोठा फायदा होणार आहे.
या उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी 3,156 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. महापालिकेने या पुलासाठी 2029ची डेडलाइन दिली असल्यामुळे मुंबईकरांना आणखी काही वर्ष या उड्डाणपुलाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यात काही अडथळे आले तर ही तारीख आणखी लांबण्याची शक्यता आहे.
Mumbai Melody Road: मुंबईतील ‘म्युझिकल रोड’वर फुल स्टॉप! आठवड्यातील 3 दिवस बंद राहणार मार्ग; 6 कोटींच्या प्रयोगाला स्थानिकांचा विरोध
मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी या प्रकल्पाबद्दल माहिती दिली, “मुंबईतील सर्वाधिक कोंडी असलेल्या परिसरात पूर्व-पश्चिम जोडणारा हा एक महत्त्वाचा पर्यायी मार्ग ठरणार आहे. या उड्डाणपुलामुळे अंधेरी-घाटकोपर लिंक रोडवरील भार वळवला जाईल. यामुळे स्थानिक मार्गांवरील कोंडी फोडण्यास मदत होणार.”
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा