ग्रामविकासमंत्री जय कुमार गोरे शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते. जिल्हा परिषद निवडणूक झाल्या नंतर सभापती निवडी झाल्या. जय कुमार गोरे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत सत्ताधारी शिवसेना राष्ट्रवादी विरुद्ध भाजपमध्येच सत्तासंघर्ष पाहायला मिळाला होता. या निवड प्रक्रियेदरम्यान मंत्री शंभूराज देसाई यांना पोलिसांकडून धक्काबुक्की झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. शंभूराज देसाई यांना या वादात इजा झाल्याचंही त्यांनी सांगितलं होत. या सगळ्या प्रकारानंतर साताऱ्याचे पोलीस अधिक्षक तुषार दोषी यांचं निलंबन करण्याचे आदेशही उपसभापतींनी विधानपरिषदेत दिले होते. मात्र हे निलंबन आता मागे घेण्यात आल्यानंतर यावर जयकुमार गोरेंना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी शंभूराज देसाई यांचं नाव न घेता जयकुमार गोरे यांनी निशाणा साधला.