• Thu. Jun 18th, 2026
    Pune Crime : घरातलं भांडण बाहेर आलं… आणि थेट ॲक्शन सीन; पुण्यात घरगुती वादाच्या भांडणात राडा झाला, जबर मारहाणीत तिघे गंभीर जखमी

    पुण्याच्या मार्केट यार्ड परिसरात नवरा-बायकोच्या किरकोळ भांडणातून धारदार शस्त्राने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात भोंड कुटुंबातील तिघे गंभीर जखमी झाले असून पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

    पुण्याच्या मार्केट यार्डात नवरा-बायकोच्या वादातून मोठा राडा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    स्नेहल निमगिरे, पुणे : पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात घरगुती वादाने धोकादायक वळण घेतलं आणि थेट हिंसाचारात रूपांतर झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नवरा-बायकोमधील किरकोळ भांडण चिघळत गेलं आणि बाहेरच्यांनी हस्तक्षेप करत धारदार शस्त्राने हल्ला चढवला. या घटनेत एकाच कुटुंबातील तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

    नेमकी घटना काय?

    २५ मार्च रोजी हा सगळा प्रकार घडला. सुरुवात साध्या घरगुती वादातून झाली. नवरा-बायकोमध्ये काही कारणावरून वाद झाला आणि तो हळूहळू वाढत गेला. बघता बघता हा वाद इतका चिघळला की बाहेरच्याही लोकांनी यात उडी घेतली.

    तिघे गंभीर

    तक्रारदार रोहितसिंग भोंड यांनी मार्केट यार्ड पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, काही जणांनी एकत्र येत शिवीगाळ करत थेट धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात रोहितसिंग भोंड, त्यांचे वडील सुरजीतसिंग भोंड आणि भाऊ रोनकसिंग भोंड हे तिघे गंभीर जखमी झाले.

    Maharashtra TimesPune Crime : ‘हाच तो’ म्हणत पिस्तूल रोखून तरुणावर गोळी झाडायचा प्रयत्न; गोळी सुटली नाही म्हणून टोळक्याचा भीषण हल्ला

    घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. लोकांनी लगेच जखमींना रुग्णालयात दाखल केलं. सध्या त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जातंय.

    सात जणांवर गुन्हा

    या प्रकरणात पोलिसांनी सागरसिंग जुनी, पिल्लूसिंग जुनी, कृष्णासिंग जुनी, अवतारसिंग जुनी, कन्हैयासिंग जुनी, ओमकारसिंग जुनी आणि शंकरसिंग जुनी या आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. सर्व आरोपींविरोधात कायदेशीर कारवाई सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी खबरदारी घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

    वाद टाळलेलं बरं

    एकंदरीत काय, छोटासा घरगुती वाद कधी एवढा मोठा होईल आणि जीवावर बेतू शकतो, याचं हे ताजं उदाहरण आहे. त्यामुळे अशा वादांना वेळेवर आवर घालणं किती गरजेचं आहे, हे पुन्हा एकदा समोर आलंय.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. गेली तीन वर्षे पत्रकार म्हणून त्यांनी प्रत्यक्षपणे काम केलं आहे, ज्यामध्ये त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये (मुंबई) इंटर्न म्हणून पत्रकारिता सुरू केली.

    मेन डेस्क
    इंटर्न म्हणून रुजू झाल्यानंतर संबंधित संपादकांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडली. सहा महिने मेन डेस्कसाठी सर्व बीटच्या बातम्यांचे काम केले.

    फोटोगॅलरी, वेबस्टोरी
    तिथंच त्यांना फोटोगॅलरी आणि वेबस्टोरी या विभागात काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचे सोने करत त्यांनी अतिशय दर्जेदार काम केले. लोकसत्तामध्ये काम करताना, राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयावर सातत्याने बातम्यांचे लिखाण केल्याने त्यातील आवड खूप वाढली.

    शिक्षण
    सुनिल यांनी पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी बीए आणि एमएपर्यंतच शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पूर्ण केले आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी स्थानिक वृत्तपत्रांसाठी शैक्षणिक बीट सांभाळत बातम्या लिहल्या.

    जाहिरात क्षेत्रात काम
    याशिवाय सुनिल यांना फोटोग्राफी, व्हिडिओ संपादन, ग्राफिक्स डिझाइनचीही आवड आहे. या आवडीला जोपासण्यासाठी त्यांनी पत्रकारिता विभागाशी संबंधित असलेल्या जाहिरात या क्षेत्रात काम केले आहे. ही काम त्यांनी स्वतःच्या आनंदासाठी केले. ज्यातून त्यांचा मोठा जनसंपर्क वाढला. काही पैसेही मिळवता आले.

    दिग्दर्शन, संगीत
    कॉलेज जीवनात त्यांनी तीन लघुपट बनवले, ज्याचे कॅमेरा, पटकथा आणि दिग्दर्शनही त्यांनी स्वतःच केले आहे. त्यांना संगीत क्षेत्रातही खास रस आहे. काव्यलेखन, गीत लेखन, सादरीकरण केलेले त्यांचे व्हिडिओ युट्यूबवर व्हायरल झालेले आहेत.

    पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित
    दरम्यान, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये संधी मिळाल्यानंतर हायपर लोकल बातम्यांचे काम करण्याचा अनुभव मिळाला. ज्यामध्ये क्राइमसह विविध महत्वाच्या आणि मोठ्या बातम्या लिहायचेही तंत्र त्यांनी विकसित केले. मटा ऑनलाईनमध्ये काम करताना सुनिल यांची पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित झाला आहे, कारण इथेही सहकाऱ्यांचे सहकार्य आणि संपादकांचे, वरिष्ठांचे, शिफ्ट इन्चार्ज यांचे अनमोल मार्गदर्शन वेळोवेळी मिळत राहते. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनने पत्रकार म्हणून घडण्याची आणखी एक खूप मोठी सुवर्णसंधी दिल्याचे सुनिल मानतात.… आणखी वाचा