पुण्याच्या गंज पेठेत हनुमान जयंतीच्या तयारीदरम्यान स्वप्नील पाटणकर या तरुणावर पिस्टल रोखून गोळी झाडण्याचा प्रयत्न झाला. गोळी न सुटल्याने टोळक्याने त्याला बेदम मारहाण केली.
पुण्याच्या गंज पेठेत तरुणावर पिस्टल रोखून जीवे मारण्याचा प्रयत्न(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
स्नेहल निमगिरे, पुणे : “हाच तो स्वप्नील…!” असा जोरात आवाज आला आणि क्षणात वातावरण बदललं. पुण्यातल्या गंज पेठेत हनुमान जयंतीच्या तयारीदरम्यान सुरू असलेला उत्साह एका क्षणात भीतीत बदलला. फलक लावत असलेल्या तरुणावर थेट पिस्टल रोखला अन हल्ला करण्यात आला आणि परिसरात एकच खळबळ उडाली.
नेमकं काय घडलं?
स्वप्नील पाटणकर (२२) हा आपल्या मित्रांसोबत वज्र मारुती मंदिराजवळ फलक लावण्याचं काम करत होता. सगळं काही सुरळीत सुरू असतानाच काही तरुण तिथे येऊन थांबले आणि त्याच्याकडे रोखून पाहू लागले. “काय बघताय?” असा प्रश्न स्वप्नीलने विचारला. मात्र कोणतीही प्रतिक्रिया न देता ते शांतपणे निघून गेले. त्यावेळी हा वाद इथंच थांबेल असंच वाटलं.अर्ध्या तासाचा एवढी गेला अन पुन्हा तीच टोळी त्याच ठिकाणी आली. यावेळी मात्र त्यांनी थेट आक्रमक पवित्रा घेतला. “हाच तो स्वप्नील!” असं म्हणत सुलतान सय्यदने लगेच पिस्टल बाहेर काढली आणि त्याच्यावर रोखली. काही क्षण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं. उपस्थित लोक घाबरून मागे सरकले. मात्र, नशिबाने पिस्टलमधून गोळी सुटलीच नाही.
Raigad News: व्हॉलीबॉल खेळताना चेंडू नदीत, तरुण पाण्यात उतरला; कित्येक तास शोधाशोध, दुसऱ्या दिवशी बॉडी हाती
गोळी सुटली नाही म्हणून…
गोळी सुटली नाही म्हणून आरोपी अजूनच तापले आणि पिस्टलच्या मागच्या बाजूने स्वप्नीलच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. तो खाली कोसळताच इतर साथीदारांनीही हल्ला चढवला. कमरेचे पट्टे, दगड आणि काचेच्या बाटल्यांचा वापर करत त्यांनी बेदम मारहाण केली. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात गोंधळ उडाला आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं.
उपचार सुरु
घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने मदत करण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते. गंभीर जखमी झालेल्या स्वप्नीलला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
चार जणांना अटक
या प्रकरणी खडक पोलिसांनी त्वरित कारवाई करत चार जणांना अटक केली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून प्राथमिक तपासात हा हल्ला जुन्या वैरातून झाल्याचं समोर आलं आहे. परिसरात तणावाचे वातावरण पाहता पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. गेली तीन वर्षे पत्रकार म्हणून त्यांनी प्रत्यक्षपणे काम केलं आहे, ज्यामध्ये त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये (मुंबई) इंटर्न म्हणून पत्रकारिता सुरू केली.
मेन डेस्क इंटर्न म्हणून रुजू झाल्यानंतर संबंधित संपादकांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडली. सहा महिने मेन डेस्कसाठी सर्व बीटच्या बातम्यांचे काम केले.
फोटोगॅलरी, वेबस्टोरी तिथंच त्यांना फोटोगॅलरी आणि वेबस्टोरी या विभागात काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचे सोने करत त्यांनी अतिशय दर्जेदार काम केले. लोकसत्तामध्ये काम करताना, राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयावर सातत्याने बातम्यांचे लिखाण केल्याने त्यातील आवड खूप वाढली.
शिक्षण सुनिल यांनी पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी बीए आणि एमएपर्यंतच शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पूर्ण केले आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी स्थानिक वृत्तपत्रांसाठी शैक्षणिक बीट सांभाळत बातम्या लिहल्या.
जाहिरात क्षेत्रात काम याशिवाय सुनिल यांना फोटोग्राफी, व्हिडिओ संपादन, ग्राफिक्स डिझाइनचीही आवड आहे. या आवडीला जोपासण्यासाठी त्यांनी पत्रकारिता विभागाशी संबंधित असलेल्या जाहिरात या क्षेत्रात काम केले आहे. ही काम त्यांनी स्वतःच्या आनंदासाठी केले. ज्यातून त्यांचा मोठा जनसंपर्क वाढला. काही पैसेही मिळवता आले.
दिग्दर्शन, संगीत कॉलेज जीवनात त्यांनी तीन लघुपट बनवले, ज्याचे कॅमेरा, पटकथा आणि दिग्दर्शनही त्यांनी स्वतःच केले आहे. त्यांना संगीत क्षेत्रातही खास रस आहे. काव्यलेखन, गीत लेखन, सादरीकरण केलेले त्यांचे व्हिडिओ युट्यूबवर व्हायरल झालेले आहेत.
पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित दरम्यान, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये संधी मिळाल्यानंतर हायपर लोकल बातम्यांचे काम करण्याचा अनुभव मिळाला. ज्यामध्ये क्राइमसह विविध महत्वाच्या आणि मोठ्या बातम्या लिहायचेही तंत्र त्यांनी विकसित केले. मटा ऑनलाईनमध्ये काम करताना सुनिल यांची पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित झाला आहे, कारण इथेही सहकाऱ्यांचे सहकार्य आणि संपादकांचे, वरिष्ठांचे, शिफ्ट इन्चार्ज यांचे अनमोल मार्गदर्शन वेळोवेळी मिळत राहते. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनने पत्रकार म्हणून घडण्याची आणखी एक खूप मोठी सुवर्णसंधी दिल्याचे सुनिल मानतात.… आणखी वाचा