• Sun. Jun 7th, 2026
    माझ्या अंतर्मनाने धोका दिला, ज्यांचं भलं केलं तेच उलटले, अशोक खरातची बडबड, पोलीस कोठडीतही मंत्रजप

    Nashik Women Assault Case : महिलांसोबत केलेलं कृत्य हा सर्व विधीचाच एक भाग होता, मी कोणावरही बळजबरी केली नाही, असं अशोक खरात म्हणाला. मी ज्यांचं भलं केलं, तेच आता माझ्यावर उलटले, असंही तो म्हणाला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जयेश साबळे, नाशिक : संपूर्ण राज्यात गाजत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात आता नवीन माहिती समोर आली आहे. महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणी अटकेत असलेला अशोक खरात पोलिस कोठडीतील तपासादरम्यान अजब दावे करत आहे. महिलांसोबत केलेलं कृत्य हा सर्व विधीचाच एक भाग होता, मी कोणावरही बळजबरी केली नाही, असं खरात म्हणाला. मी ज्यांचं भलं केलं, तेच आता माझ्यावर उलटले, असंही तो म्हणाला.

    “माझ्या अंतर्मनाने धोका दिला”

    पोलिस चौकशीत अशोक खरातने आपल्या कृत्याबाबत उद्विग्न प्रतिक्रिया दिली. आपल्या कृत्याचे समर्थन करण्याचा प्रयत्न एक प्रकारे त्याने केला आहे. “माझ्या अंतर्मनाने मला धोका दिला, ज्यांचे मी भले केले तेच आता माझ्यावर उलटले आहे” असे विधान खरात यांनी केल्याची माहिती समोर येत आहे.

    “हा सर्व विधीचाच भाग”

    एवढंच नव्हे तर तपासा दरम्यान खरातने महिलांसोबत केलेल्या आक्षेपार्ह वर्तनाचं समर्थन करत “हा सर्व विधीचाच एक भाग होता” असा अजब दावा त्याने केला. मी कोणावर देखील जबरदस्ती केली नाही, असे सांगत त्याने स्वतःचा एक प्रकारे बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे.
    Maharashtra TimesRishikesh Vaidya : मी महादेवाचा अवतार; पुण्यातील विवाहितेवर लॉजमध्ये अत्याचार, वसईच्या स्वयंघोषित धर्मगुरुवर गुन्हा, खरात केसनंतर महिलेला बळ

    पोलीस कोठडीतही मंत्रजप

    आणखी एक विशेष बाब म्हणजे, पोलिस कोठडीत असतानाही खरात याचा मंत्रजप सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. “यापुढे मी फक्त माझ्या मेंदूचंच ऐकणार” असे खरात बोलल्याची माहिती देखील पुढे आली आहे.

    Ashok kharat news : नागाची भीती आणि चिंचोक्या विकून खरातनं 2 हजार कोटींची माया कशी जमवली ?

    अशोक खरात याने आध्यात्म्याच्या नावाखाली अनेक महिलांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात आता पोलीस अधीक्षक सखोल तपास करत असून त्याच्या या दाव्या मागची सत्यता पडताळून पाहिली जात आहे.
    Maharashtra TimesNashik News : शिवलिंगाची शक्ती क्षीण, वैजेश्वर मंदिर रातोरात पाडा; खरातने दिलेला सल्ला, गावकऱ्यांच्या हुशारीने यादवकालीन देऊळ सुरक्षित

    तक्रारी वाढण्याची शक्यता

    अशोक खरात याच्या विचित्र वागण्यामुळे आणि विधानांमुळे पोलीस देखील काहीसे चक्रावून गेले आहेत. महिलांनी धैर्याने पुढे येऊन तक्रार दिल्यानंतर या भोंदूबाबाचे खरे रूप जगासमोर आले आहे. भोंदू खरात याच्या विरोधात आणखी काही तक्रारी देखील समोर येण्याची शक्यता आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा