• Sat. Jun 6th, 2026
    Narhari Zirwal Viral Video: राजीनामा की अभय? आक्षेपार्ह व्हायरल व्हिडीओनंतर नरहरी झिरवाळ याचं पद पुन्हा धोक्यात

    Narhari Zirwal Viral Video: या व्हिडिओनंतर राज्यभरातून झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे, तर नाशिकमध्ये आंदोलने सुरू झाल्याने राष्ट्रवादीसह झिरवाळांची कोंडी झाली आहे.

    नरहरी झिरवाळ(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म.टा.विशेष प्रतिनिधी, नाशिक: मंत्रालयातील लाच प्रकरणातून सहिसलामत सुटलेले अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ पुन्हा अडचणीत आले आहेत. मुंबईतील ‘सुरूची’ या शासकीय निवासस्थानात एका तृतीयपंथीसोबतचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्याने झिरवाळांचे मंत्रिपद पुन्हा धोक्यात आले आहे.

    विधिमंडळाचे अधिवेशन संपल्याच्या दिवशी मंत्री झिरवाळ यांचा मुंबईतील शासकीय निवासस्थानातील तृतीयपंथीसोबतचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला. तृतीयपंथी पवन यादवसोबतच्या या व्हिडिओमुळे शासकीय निवासस्थानाचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप केला जात आहे.

    Maharashtra TimesAshok Kharat : 90 लाखांची मर्सिडीज कार ते दुसऱ्याच्या पैशांवर अनेक देश फिरला, खरातने व्यावसायिकाला काळी जादूच्या भीतीने कोट्यवधीने लुटलं
    मंत्रालयातील लाच प्रकरणातही झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, त्यातून दिलासा मिळाल्यानंतर झिरवाळ या आक्षेपार्ह व्हिडिओमुळे पुन्हा अडकले आहेत.

    ‘मंत्र्यांमुळे नाचक्की’
    मुंबई : ‘भोंदूबाबा खरात प्रकरणात डझनभर मंत्र्यांच्या अश्लील व अश्लाघ्य कारनाम्याने महाराष्ट्राची पुरती नाचक्की झालेली असताना झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होणे हे राज्याच्या राजकारणातील नैतिक अध:पतनाचे ज्वलंत उदाहरण आहे. सरकारने झिरवाळांची मंत्रिपदावरून तत्काळ हकालपट्टी करावी,’ अशी मागणी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली सरकारकडे आहे.

    Maharashtra TimesNashik Accident: खड्ड्यांचा आणखी एक बळी! अंबड लिंकरोडवर टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार, नागरिकांचा संताप
    नाशिकमध्ये पुतळादहन
    राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या मागे लागलेले शुक्लकाष्ठ संपत नसल्याचे चित्र आहे. मस्साजोगच्या देशमुख हत्याकांडात धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला होता. पाठोपाठ नाशिकचे क्रीडामंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाच्या शिक्षेप्रकरणी राजीनामा द्यावा लागला होता. आता राष्ट्रवादीतील अंतर्गत वर्चस्ववादातून झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आल्याने राष्ट्रवादीची अडचण झाली आहे. या प्रकरणात झिरवाळ यांची ‘विकेट’ पडल्यास जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या दुसऱ्या मंत्र्याची गच्छंती होईल.

    Maharashtra TimesAshok Kharat : खरातच्या केबिनमध्ये महिला शिरताच झुंबर बंद, कर्मचाऱ्यांसाठी नो एन्ट्रीचा ‘कोडवर्ड’, थक्क करणारे कारनामे
    काँग्रेसकडून आज आंदोलन
    ‘झिरवाळांनी केलेल्या या कृत्यामुळे त्यांचे शासकीय निवासस्थान त्वरित काढून घ्यावे व कुंभमेळ्याच्या कुठल्याही नियोजन बैठकीला त्यांना बोलवू नये,’ अशी मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश छाजेड यांनी केली आहे. काँग्रेसच्या सर्व शाखांकडून आज, शुक्रवारी झिरवाळ यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन केले जाणार असल्याची माहितीही अॅड. छाजेड यांनी या वेळी दिली.

    संबंधित व्हिडिओ ‘एडिट’ केला आहे. त्यामुळे या प्रकाराशी माझा काहीही संबंध नाही. याबाबत मला अधिक बोलायचे नाही. –नरहरी झिरवाळ, अन्न व औषध प्रशासनमंत्री

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा