Dr Jaysingrao Pawar Passes away : राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचे खंदे पुरस्कर्ते म्हणून ओळख असलेल्या डॉ. जयसिंगराव पवार यांचे कोल्हापुरात निधन झाले
डॉ जयसिंगराव पवार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
कोल्हापूर : ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचं निधन झालं. गुरुवारी पहाटेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचे खंदे पुरस्कर्ते म्हणून डॉ. जयसिंगराव पवार यांची ओळख होती.
गेल्या काही दिवसांपासून डॉ जयसिंगराव पवार यांची प्रकृती अस्वस्थ होती. फुफ्फुसाच्या संसर्गामुळ जवळपास दीड महिन्यांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचारही सुरु होते. गुरुवारी पहाटेच्या सुमारास त्यांनी कोल्हापुरात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठेशाहीचा इतिहासकार हरपल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत.
कोण होते डॉ. जयसिंगराव पवार?
डॉ. जयसिंगराव पवार यांचा जन्म ३० डिसेंबर १९४१ रोजी सांगली जिल्ह्यातील तडसरला झाला. डॉ. जयसिंगराव पवारांनी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून एमए आणि पीएचडी पदवी संपादन केली. Ashok Kharat : खरातच्या केबिनमध्ये महिला शिरताच झुंबर बंद, कर्मचाऱ्यांसाठी नो एन्ट्रीचा ‘कोडवर्ड’, थक्क करणारे कारनामे तीन दशकांहून अधिक काळ त्यांनी महाविद्यालयात अध्यापन केलं. विद्यार्थिप्रिय प्राध्यापक म्हणून त्यांची ख्याती होती. एमएपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांची २० क्रमिक पुस्तकं अभ्यासक्रमात होती. शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू आणि इतिहास संशोधक डॉ. अप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. जयसिंगरावांनी १९६४ मध्ये संशोधन कारकिर्दीला सुरुवात केली.
जयसिंगराव पवार यांनी महाराणी ताराबाई, सेनापती संताजी घोरपडे, मराठेशाहीचा मागोवा, राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ यासारखे २५ हून अधिक इतिहासविषयक ग्रंथ लिहिले. Dog Attack : भटक्या कुत्र्याची झडप, वंशिकाताई धीराने लढली, स्वतः जखमी झाली, पण चिमुकल्या भावावर ओरखडाही नाही, अंबरनाथमधील घटना राजर्षी शाहू महाराजांचं कार्य आणि धोरणे समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी डॉ जयसिंगराव पवार आयुष्यभर झटत होते. इतिहासाचा भाग असलेल्या करवीर संस्थापिका ताराराणी यांच्या चरित्र लेखनातून त्यांच्या कर्तृत्वाची ओळख करुन देण्याची महत्त्वाची कामगिरी त्यांनी बजावली. राजर्षी शाहू महाराजांच्या चारित्राला न्याय देण्याचं काम त्यांनी कृतज्ञतेपोटी केलं. दादोजी कोंडदेव यांच्याविषयी महत्त्वाची मांडणीही डॉ पवारांनी केली. पंचगंगा तिरी हे डॉ. जयसिंगराव पवार यांचं आत्मचरित्र विशेष गाजलं.
जयसिंगराव पवार यांची प्रकाशित झालेली पुस्तकं कोणती?
महाराणी ताराबाई क्रांतिसिंह नाना पाटील सेनापती संताजी घोरपडे संभाजी स्मारक ग्रंथ मराठेशाहीचा मागोवा मराठी साम्राज्याचा उदयास्त शिवचरित्र- एक मागोवा शिवचरित्रापासून काय शिकावे? आमच्या इतिहासाचा शोध व बोध
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा