• Wed. Sep 23rd, 2026
खरातच्या केबिनमध्ये महिला शिरताच झुंबर बंद, कर्मचाऱ्यांसाठी नो एन्ट्रीचा ‘कोडवर्ड’, थक्क करणारे कारनामे

Nashik Woman Assault Case : संपूर्ण कुटुंबाला एकत्र बसवून त्यांच्यासमोर पतीला एकच मूल तुझं आहे, दुसरं तुझं नाही असे खरात सांगे. असं करून त्याने अनेक जोडप्यांचे घटस्फोटही घडवून आणले आहेत. नंतर या महिलांना तो वासनेच्या जाळ्यात ओढी.

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : भोंदूगिरी करणारा ‘कॅप्टन’ अशोक खरात याच्या कुकर्मांचे बिंग फुटल्यापासून त्याचे दररोज नवनवीन कारनामे उजेडात येत आहेत. खरात याची फसवणुकीची, महिलांचे लैंगिक शोषण करण्याची खास कार्यपद्धतीची पंचसूत्री होती. या पंचसूत्रीच्या बळावर खरात समोरच्याचा विश्वास संपादन करून त्यांना जाळ्यात ओढत असे.

अचूक जन्मवार सांगण्याचे कसब

भोंदू अशोक खरात हा त्याच्याकडे येणाऱ्यास जन्मतारीख विचारून अचूक जन्मावर सांगत असे. असे करून तो आपण अफाट बुद्धिमान असल्याचे भासवत असे.

महिलांची सहानुभूती

अशोक खरात हा त्याच्याकडे येणाऱ्या जोडप्यांना समोर बसवून त्यांच्या आर्थिक संपन्नतेचा प्रथम अंदाज घेत. तुम्हाला एकच संतती होईल. दुसरे अपत्य होऊ शकणार नाही. त्यात पती दोषी असल्याचे तो दोघांना सांगत. त्यामुळे पती-पत्नीत वितुष्ट निर्माण होई. अशा परिस्थितीत खरात महिलेची सहानुभूती मिळविण्यात यशस्वी होई. दोन अपत्ये असतील, तर अशा जोडप्याला त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला एकत्र बसवून त्यांच्यासमोर पतीला एकच मुल तुझे, दुसरे तुझे नाही असे तो सांगे. असे करून खरातने अनेक जोडप्यांचे घटस्फोटही घडवून आणले. नंतर या महिलांना वासनेच्या जाळ्यात ओढी.

मुलींमार्फत अधिकारी, उद्योगपतींची लूट

खरात हा मोठे अधिकारी, उद्योगपतींसोबत मुलींचे संबंध जुळवून द्यायचा. त्यासाठी तो अंकशास्त्राचा आधार घेत असल्याचे भासवायचा. नंतर मर्जीतील मुलीला अधिकारी, उद्योगपतीच्या विरोधात फितवून त्यांच्याविरोधात स्वतःकडे तक्रार घ्यायचा. मुलीच्या तक्रारीचा व्हिडीओ करायचा.
Maharashtra TimesHarish Rana : धाकट्या भावाकडून हरीशला मुखाग्नी; वडील म्हणाले, कुणी रडू नका, माझा लेक शांतपणे जगाचा निरोप घेईल

भोंदूगिरीच्या आडून भूखंड खरेदी-विक्री

जोडप्यांना समोर बसवून पत्नीमुळेच यशस्वी झाल्याचे पतीला सांगून तो महिलेच्या मनात सहानुभूती तयार करीत असे. भाग्य उजळण्यासाठी त्यांना वास्तव्याची जागा, घर बदलण्यास सांगे. अंकशास्त्राचा आधारे त्यांना जागा सुचवून ती खरेदी करण्यास भाग पाडत असे. ही जागा त्याचीच असे.

चाकणकरांच्या राजीनाम्यावरून राष्ट्रवादीत फूट, विरोधकांच्या खळबळजनक दाव्यांनी खरात प्रकरण तापलं

आलेली व्यक्ती बघून फोन करणे

खरात हा त्याच्याकडे येणारी व्यक्ती कोण आहे हे बघून ती व्यक्ती ज्या क्षेत्रातील आहे, त्या क्षेत्रातील वरिष्ठ पातळीवरील व्यक्तींना फोनवर संपर्क करून आपला वट दाखवित असे. पोलिस अधिकारी आल्यास त्यांच्यासमोर खरात थेट ‘एडीजी’, ‘आयजी’ यांना फोन करीत असे. लोकप्रतिनिधी आल्यास मंत्र्यांना फोन करून त्यांच्याशी संवाद साधून स्वतःची पोहोच दाखवित असे.
Maharashtra TimesCrime News : प्रेयसीसाठी बायकोचा काटा काढला, कार पेटवून अपघात भासवला, पण CNG टँकमुळे पोलखोल, डॉक्टर नवरा जाळ्यात

सांकेतिक शब्दांचा वापर

तो ज्या खोलीत महिलांना घेऊन जाई आणि ठोकताळ्यांवर आधारित भाकीत सांगे, प्रसंगी लैंगिक अत्याचार करे, त्या खोलीच्या बाहेरील छताला असलेल्या झुंबरचा लाइट आतून बंद करीत असे. या झुंबरातील लाइट बंद तोपर्यंत चेंबरमध्ये कोणालाही प्रवेश द्यायचा नाही, हा त्याचा अर्थ असे. त्याच्या कार्यालयात काम करणाऱ्यांना ही सांकेतिक भाषा ठाऊक होती.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा