Jalgaon Accident News : राज्यात अपघातांचं प्रमाण देखील प्रचंड प्रमाणात वाढत चाललं आहे. त्याचदरम्यान, काल जळगावमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
जळगाव पती पत्नी अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
निलेश पाटील, जळगाव : जळगाव जिल्ह्यामध्ये दररोज अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असून अनेकांचा यात बळी जात आहे. असाच एक भीषण अपघात काल बुधवारी झाला. चुलत भावाच्या मुलीचं लग्न आटोपून येत असताना दाम्पत्याच्या दुचाकीला एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत पोलीस ठाण्यात अद्यापपर्यंत कुठलाही नोंद करण्यात आलेली नव्हता.
नेमका कसा झाला अपघात?
जळगाव तालुक्यातील उमाळा-गाडेगावजवळ झालेल्या भीषण अपघातात पिंप्राळा हुडको येथील दाम्पत्य यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल बुधवारी रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गर्दी केल्याचं दिसून आलं. मुझफ्फर अली सय्यद बबन (वय ६०) आणि ताहेराबी मुजफ्फर अली (वय ५५) दोन्ही रा. पिंप्राळा हुडको, जळगाव असं मयत झालेल्या दाम्पत्याचं नाव आहे. Jaysingrao Pawar : मराठेशाहीचा इतिहासकार हरपला, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचं निधनजळगाव शहरातील पिंप्राळा हुडको परिसरामध्ये मुझफ्फर अली सय्यद बबन हे आपली पत्नी ताहेराबी आणि दोन मुलांसह वास्तव्याला होते. मसाला विक्री करून ते आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. काल बुधवारी रोजी त्यांच्या चुलत भावाच्या मुलीचं लग्न असल्याकारणामुळे ते आपल्या पत्नी ताहेराबी यांच्यासोबत दुचाकी क्रमांक एमएच १९ इजे ३८९८ जळगाव येथून फर्दापूर येथे गेले होते. Ashok Kharat : खरातच्या केबिनमध्ये महिला शिरताच झुंबर बंद, कर्मचाऱ्यांसाठी नो एन्ट्रीचा ‘कोडवर्ड’, थक्क करणारे कारनामे
कुटुंबाचा रुग्णालयामध्ये आक्रोश
दरम्यान, लग्न आटपून सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील उमाळे ते गाडेगाव दरम्यानच्या पुलाजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीसह दोघेजण खाली पडले. या भीषण अपघातात मुझफ्फर अली सय्यद बबन आणि ताहेराबी मुजफ्फर अली हे गंभीररीत्या जखमी झाल्याने त्यांना खासगी वाहनातून जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केलं. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी केली असता दोघांना मयत घोषित केलं. सदर घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयामध्ये एकच गर्दी करून मोठा आक्रोश केला. याबाबत पोलीस ठाण्यात अद्यापपर्यंत कुठलीही नोंद करण्यात आलेली नव्हती. त्यांच्या पश्चात दोन मुलं, सुना, एक विवाहित मुलगी असा परिवार आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा