Nagpur Airport Digiyatra Update: पडताळणीची प्रक्रिया सोपी होईल आणि प्रवाशांचा मौल्यवान वेळ वाचून त्यांना एक सुरक्षित व संपर्करहित प्रवासाचा अनुभव मिळेल.
डिजीयात्रा अॅपवर नोंदणी आणि बोर्डिंग पास लिंक केल्यानंतरही प्रवाशांना प्रवेशद्वारावर जाऊन आधी आपला बोर्डिंग पास स्कॅन करावा लागत असे. त्यानंतरच चेहऱ्याची पडताळणी होऊन गेट उघडत असे. आता डिजीयात्रा गेटवर आल्यावर प्रवाशांना बोर्डिंग पास स्कॅन करण्याची गरज नाही. जीएमआर नागपूर इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत भांडारकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘नागपूर विमानतळावर प्रवाशांचा प्रवास अधिकाधिक सुखकर आणि अडथळामुक्त करणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. ‘सिंगल-स्टेप फेस रेकग्निशन’च्या अद्ययावत यंत्रणेमुळेे मानवी हस्तक्षेप कमी होईल.
Bageshwar Baba: बागेश्वर बाबा पुन्हा अडचणीत, ‘पुत्रयोगा’चा दावा खोटा ठरला? भक्ताला चौथ्यांदाही मुलगी, कुटुंबाची अंनिसकडे तक्रारया सुविधेचा लाभकसा घ्यावा ?
आपल्या मोबाइलमध्ये डिजीयात्रा अॅप डाउनलोड करून आवश्यक माहिती व चेहऱ्याचे ‘ ऑथेंटिकेशन ’ पूर्ण करावे. प्रवासाच्या दिवशी अॅपमध्ये आपला बोर्डिंग पास अपलोड करून प्रवासाची माहिती नागपूर विमानतळासोबत शेअर करावी. विमानतळावर पोहोचल्यावर डिजीयात्रा गेटसमोर फक्त उभे राहावे. चेहरा ओळखताच क्षणार्धात गेट उघडेल. या सुविधेमुळे विमानतळावरील प्रवेशादरम्यान लागणाऱ्या रांगा कमी होण्यास मदत होणार असून प्रवाशांना अधिक वेगवान सेवा मिळणार आहे.
Nagpur Crime: 11 वर्षांचे प्रेमसंबंध, प्रियकराचा लग्नास नकार, व्हिडिओ कॉलवर तरुणीने संपवलं जीवन, 23 मिनिटं लाईव्ह सुरुचविमानतळाचे प्रश्न चर्चेविना खोळंबले
पुणे विमानतळाच्या विकास व समस्या सोडवण्यासंबंधित विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी महत्त्वाची असलेली विमानतळ सल्लागार समितीची (एएसी) बैठक जवळपास वर्षभरापासून झालेली नाही. विमानतळ सल्लागार समितीच्या बैठका सहा महिन्यांतून एकदा होणे अपेक्षित असताना, शेवटची बैठक एप्रिल २०२५ मध्ये झाली होती. पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ हेच केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री असल्यामुळे त्यांनी बैठक तातडीने बोलवावी, अशी मागणी केली जात आहे.
