• Wed. Sep 23rd, 2026

Raj Thackeray On Sahil Wakode : साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणावर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकत आपली महत्त्वाची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

राज ठाकरे ऑन साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : मुंबई येथे आयआयटीच्या द्वितीय वर्षात शिकणाऱ्या यवतमाळच्या साहिल वाकोडे या विद्यार्थ्याने गळफास लावून 18 सप्टेंबर रोजी आत्महत्या केली. सदर घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. परीक्षेदरम्यान मोबाइलचा वापर केल्याचा आरोप झाल्यानंतर या विद्यार्थ्यानं हे टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. या सगळ्या प्रकरणावर आता मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. त्यात ते म्हणाले आहेत की, ‘साहिल वाकोडे याचा मृत्यू दुर्दैवी आहे. जे घडलं ते या शिक्षण व्यवस्थेतील आपणच निर्माण केलेल्या दोषांमुळे घडलं. यावर काम करणं हीच साहिल वाकोडे आणि त्याच्यासारख्या अनेकांनी ज्यांनी ताण सहन न होऊन स्वतःचा जीव दिला आहे, त्यांना श्रद्धांजली ठरेल’, असं राज ठाकरे सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाले.

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

आयआयटी मुंबईमध्ये साहिल वाकोडे या वीस वर्षांच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली. परीक्षेदरम्यान त्याने मोबाईल आणि चॅटजीपीटीचा वापर केल्याचा आरोप आयआयटी प्रशासनाने सुरुवातीला केला. हा आरोप तपास पूर्ण होण्याआधी जाहीर करणं अयोग्य होतं, हे मान्य करत प्रशासनाने नंतर माफीही मागितली. दुसरीकडे साहिलच्या कुटुंबीयांनी जातीय छळाचे आरोप केले आहेत. त्या आरोपांवर गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू आहे. प्राध्यापकांनीही आपली बाजू मांडली आहे. या सगळ्या प्रकरणात एक तरुण मुलगा आपल्यातून गेला, त्याला थेट आत्महत्येचा मार्गच का स्वीकारावासा वाटला यावर कोणीच बोलताना दिसत नाहीये.

Maharashtra TimesWeather Alert : महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात पावसाचा जोर वाढला, सर्वत्र पावसाचं धुमशान, 72 तास महत्त्वाचे; हवामान विभागाचा ताजा अंदाज
एखादा विद्यार्थी परीक्षेत गैरप्रकार करत असेल, तर त्याला रोखणं आणि त्याच्यावर नियमानुसार कारवाई करणं हे प्राध्यापकांचं कर्तव्यच आहे. पण आरोप सिद्ध होण्याआधी मृत विद्यार्थ्याला गुन्हेगार ठरवणं योग्य नाही. त्याचप्रमाणे जातीय छळाचा आरोप झाला म्हणून चौकशी पूर्ण होण्याआधी प्राध्यापकांना दोषी ठरवणंही योग्य नाही. पण या सगळ्याचा कुठेच विचार होत नाही. कारण या विषयांत आता ‘जात’ हा मुद्दा पुढे आणून, एका वीस वर्षांच्या मुलाला एका प्रसंगानंतर आपल्या आयुष्याचे सगळे मार्ग संपले आहेत, असं का वाटलं असेल? यावर बोलायचं नाहीये. विचार करायचा नाहीये, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

महाराष्ट्रात जात इतकी फोफावली आहे की…

मी अनेकदा माझ्या भाषणांमध्ये सांगितलं आहे की २००० सालानंतर महाराष्ट्रात जात इतकी फोफावली आहे की आपल्या शेजारी शाळेत बसणारा विद्यार्थी कुठल्या जातीचा आहे हे सांगू लागलेत, वर्षानुवर्षे एकत्र डबा खाणारे ऑफिसमधले कर्मचारी जातीच्या नजरेतून एक दुसऱ्यांकडे पहायला लागलेत. आणि हे इतकं विषारी होत चाललं आहे की हे आता आयआयटीपर्यंत पोहचलं आहे. पंडित नेहरूंनी आयआयटीचं वर्णन आधुनिक भारताची मंदिरं असं केलं होतं त्या आयआयटीत विद्यार्थ्यांची आत्महत्या झाली, एक सहकारी आपल्यातून गेला यापेक्षा हे सगळं जातीतून घडलं हा पैलू पुढे यावा, यासारखं दुर्दैव नाही.

Maharashtra TimesBMW Car Crash : तीन मित्रांचा मृत्यू डोळ्यादेखत पाहिला, बीएमडब्ल्यू कार अपघातात जखमी आदित्यची प्रकृती गंभीर, आयसीयूमध्ये व्हेंटिलेटर सपोर्टवर

काही शे सीट्ससाठी लाखो विद्यार्थी बसतात

मुळात आयआयटी असो की त्याच्या आधीच्या कुठल्याही स्पर्धा परीक्षा असोत या जीवघेण्या होत चालल्या आहेत. काही शे सीट्ससाठी लाखो विद्यार्थी बसतात, त्यातून निवड झाली की अभ्यासाचं ओझं, मग कॅम्पस सिलेक्शनमध्ये काय होईल याचा ताण. त्यात आयआयटी असो की आयआयएम असो पूर्वीसारखे कॅम्पस निवडीत उत्तम पगार मिळत नाही. बरं हे नैराश्य फक्त आयआयटी विद्यार्थ्यांनाच आहे असं नाही तर ते सर्वत्र आहे. अगदी कॉमर्स, आर्टस् शाखेच्या विद्यार्थ्यांपासून ते डॉक्टर्स, इंजिनिअर्सपर्यंत सगळ्यांना याचा ताण आहे. या नैराश्यातून साहिलने आत्महत्या केली. त्यामुळे या एकूणच पूर्णपणे मोडकळीस आलेल्या शिक्षण व्यवस्थेला प्रश्न विचारून ते बदलायचं? का आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याची आणि त्याला जाब विचारणाऱ्याची जात काढत बसायची, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.

शिक्षणाचं बाजारीकरण

प्रश्न हे सरकार का ते सरकार नाहीच आहे. गेल्या ३०,४० वर्षांत शिक्षणाचं बाजारीकरण करण्याच्या नादात आपण पूर्ण भारतीय शिक्षण व्यवस्थेचं अपरिमित नुकसान केलं आहे. त्यात आमूलाग्र बदल आणले पाहिजेत. याची सुरुवात नुकत्याच झालेल्या जेन झी आंदोलनातून होत आहे असं वाटत असताना हा प्रकार पुढे आला. माझी विद्यार्थ्यांना विनंती आहे की तुमच्या आंदोलनाला देशभरातून प्रतिसाद मिळाला कारण तुमचा मुद्दा हा व्यवस्थेतील दोषांवर उपाय हवा यासाठी होता. तुमचं आंदोलन हे याच मार्गाने पुढे चालू राहायला हवं. कारण तसं राहिलं तर सरकारला अनेक प्रश्नांना उत्तरं द्यावी लागतील, काही कृती पण करावी लागेल. आणि सरकारला हे करायचं आहे का ? असेल तर आनंदच आहे आणि नसेल तर जात धर्म ही अमोघ अस्त्र त्यांच्याकडे आहेतच. एकदा जात धर्म आणला की विषय भरकटवायला सोपा होतो. असल्या भानगडीत कोणीच पडू नका.

Maharashtra TimesNashik Crime : डॉ नीलेश जेजूरकरचं डॉक्टर मैत्रिण स्वाती चव्हाणशी काय चॅटिंग व्हायचं? मोबाईल फॉरेन्सिककडे, दोघं एकत्रच मध्यवर्ती कारागृहात
आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांनी कौन्सिलिंगची व्यवस्था, चोवीस तास सायकिऍट्रिस्टची उपलब्धता, तक्रार केली तर ती खरंच सोडवली जात आहे यातली पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांनी शिस्त मोडली तर त्याच्यावर कारवाई करताना तो खचणार नाही अशी व्यवस्था या मागण्या केल्या आहेत. त्यांच्या आंदोलनाची खरी दिशा हीच असली पाहिजे. शिक्षणव्यवस्थेतील दोष दुरुस्त करण्यासाठीच हे आंदोलन पुढे गेलं, तर सरकार आणि प्रशासनाला त्यावर उत्तरं द्यावी लागतील आणि कृतीही करावी लागेल.

विद्यार्थ्यांनी त्यात अडकू नये

सत्तेचं राजकारण करण्यात स्वारस्य असणाऱ्यांना जात हा विषय आवडीचा असतो, विद्यार्थ्यांनी त्यात अडकू नये, उलट असल्या राजकारण्यांना त्यांची लायकी दाखवावी. आपल्या सरकारी यंत्रणेतील दोषांवर कोणीही बोलू अथवा आंदोलनं करू नये ( कारण पुन्हा केंद्रीय शिक्षण खात यात अडकत , ज्या खात्याच्या मंत्र्याचा आत्ताच राजीनामा मागण्याचं आंदोलन झालं ) म्हणून जात धर्माचं शस्त्र वापरून त्यात तुम्हाला अडकवून मूळ विषया पासून तुमचं लक्ष भरकटवायचं हेच सध्या सुरू आहे असं दिसतंय. आयआयटीच काय किंवा कुठल्याही कॅम्पसवरती हे मुद्दे होऊन तुमच्यात मनभेद होतील आणि फूट पडेल असं काही करू नका.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा