• Wed. Sep 23rd, 2026

मुंबई : मुंबईच्या कोस्टल रोडवर झालेल्या बीएमडब्ल्यू कारच्या भीषण अपघातातून वाचलेला एकमेव १७ वर्षीय तरुण, आदित्य ओसवाल याची प्रकृती गंभीर असली तरी ती चिंताजनक नाही, अशी माहिती त्याच्यावर उपचार करणाऱ्या एका वरिष्ठ आयसीयू डॉक्टरांनी दिली. तीन मित्रांचा मृत्यू डोळ्यादेखत पाहिलेल्या आदित्यची प्रकृती कशी आहे, याकडे अनेकांचे डोळे लागले होते.

आयसीयूमध्ये व्हेंटिलेटर सपोर्टवर

रविवारी बीएमडब्ल्यू कार कोस्टल रोडवरुन हवेत उडून कोसळून झालेल्या अपघातात शनय गज्जर, धैर्य सेठ, आदित्य जसकानिया या तिघा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. यात जखमी झालेल्या आदित्यवर दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून, तो सध्या ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये व्हेंटिलेटर सपोर्टवर आहे. डॉक्टरांनी सांगितले की, शस्त्रक्रियेनंतर त्याचे महत्त्वाचे शारीरिक संकेत (वायटल पॅरामिटर्स) स्थिर राहिले आहेत. त्याची प्रकृती तूर्तास अधिक ढासळलेली नाही.

“आदित्य व्हेंटिलेटर सपोर्टवर आहे आणि विविध तज्ज्ञांची टीम त्याच्यावर चोवीस तास लक्ष ठेवून आहे. अपघातातील दुखापतींनंतर त्याच्यावर दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. दुखापतींचे स्वरुप पाहता त्याची प्रकृती गंभीर आहे, परंतु सध्या त्याला ‘अतिगंभीर’ श्रेणीत ठेवलेले नाही” असे डॉक्टरांनी सांगितले.

Sahil Wakode : परीक्षा केंद्रात साहिल खिशातून काहीतरी काढताना दिसतो, डुल्लांची विचारणा, पोलिसांना सीसीटीव्हीत काय दिसलं? महत्त्वाचे पुरावे हाती

पोटाच्या भागात गंभीर दुखापतीचा संशय

त्याच्यावर करण्यात आलेल्या प्रमुख शस्त्रक्रियांपैकी एक म्हणजे ‘एक्सप्लोरेटरी लॅपरोटॉमी’. ही एक आपत्कालीन शस्त्रक्रिया आहे जी गंभीर दुखापतींच्या वेळी केली जाते, जेणेकरुन स्कॅनमध्ये त्वरित न दिसणाऱ्या अंतर्गत दुखापती शोधून त्यावर उपचार करता येतील. अपघाताची तीव्रता पाहता, डॉक्टरांना पोटाच्या भागात गंभीर दुखापत झाल्याचा संशय होता.

या प्रक्रियेदरम्यान, तज्ज्ञांनी अंतर्गत रक्तस्राव आणि अवयवांचे नुकसान तपासण्यासाठी त्याच्या पोटाच्या भागाची तपासणी केली. वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना ‘इन्फिरियर वेना कावा’ (आयवीसी) मध्ये रक्ताची गुठळी (ब्लड क्लॉट) असल्याचेही आढळले; ही शरीराच्या खालच्या भागातून हृदयाकडे रक्त वाहून नेणारी एक मुख्य रक्तवाहिनी आहे. या स्थितीसाठी त्वरित वैद्यकीय उपचारांची गरज होती आणि त्यावर आता बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

“रस्त्यावरील मोठ्या अपघातांमध्ये, बाह्य दुखापतींपेक्षा अंतर्गत दुखापती अनेकदा अधिक गंभीर असतात. ‘एक्सप्लोरेटरी’ शस्त्रक्रियेमुळे डॉक्टरांना अशा दुखापती शोधता येतात ज्या केवळ इमेजिंग चाचण्यांमधून पूर्णपणे स्पष्ट होत नाहीत” असे आयसीयू डॉक्टरांनी सांगितले.

Maharashtra TimesNashik Accident : मुलाखतीसाठी भावासोबत निघाली, वाटेत बसने उडवलं, 22 वर्षांच्या पूनमची मृत्यूशी झुंज अपयशीत्यानंतर, उपचारांचा भाग म्हणून आदित्यवर दुसरी शस्त्रक्रिया करण्यात आली. रुग्णालयाच्या प्रशासनाने या प्रक्रियेचा तपशील उघड केला नाही, परंतु सूत्रांनी सांगितले की ही शस्त्रक्रिया त्याच्या वैद्यकीय तपासणीदरम्यान आढळलेल्या दुखापतींशी संबंधित होती आणि त्याचा उद्देश त्याची प्रकृती स्थिर करणे हा होता.

व्हेंटिलेटर सपोर्ट सुरू

डॉक्टर आयसीयूमध्ये त्याच्या श्वसन, हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या स्थितीवर लक्ष ठेवून आहेत. अनेक गंभीर दुखापती आणि शस्त्रक्रियांमधून सावरत असताना, त्याला श्वास घेण्यास मदत करण्यासाठी आणि शारीरिक ताण कमी करण्यासाठी व्हेंटिलेटर सपोर्ट सुरू ठेवण्यात आला आहे.

रुग्णालयाच्या सूत्रांनी हे देखील स्पष्ट केले की अलिकडील तपासणीत बरगड्यांना फ्रॅक्चर झाल्याचा कोणताही पुरावा आढळला नाही; अपघातानंतर आलेल्या सुरुवातीच्या वृत्तांमध्ये तसा दावा करण्यात आला होता.

कोस्टल रोडवर भीषण अपघात

हा अपघात रविवारी पहाटे ५.२० वाजताच्या सुमारास कोस्टल रोडच्या उत्तर दिशेकडे जाणाऱ्या मार्गिकेवर झाला होता. तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, चार विद्यार्थ्यांसह जाणारी बीएमडब्ल्यू कार मरीन ड्राइव्हवरून हाजी अलीच्या दिशेने जात होती, तेव्हा ‘लोटस जेटी’ जवळील एका वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. मिळालेल्या माहितीनुसार, गाडी रस्त्याच्या कडेला असलेला सुरक्षा अडथळा तोडून खाली बांधकामाधीन असलेल्या पार्किंगच्या इमारतीत सुमारे ७० फूट खोल कोसळले. या अपघातात कारमधील तिघे जण मरण पावले, तर आदित्य ओसवाल यांला गाडीच्या ढिगाऱ्यातून जिवंत बाहेर काढण्यात आले.

त्याला सुरुवातीला आपत्कालीन उपचारांसाठी नायर रुग्णालयात नेण्यात आले आणि त्यानंतर विशेष ‘ट्रॉमा केअर’साठी ब्रीच कँडी रुग्णालयात हलवण्यात आले.

Maharashtra TimesNashik Crime : डॉ नीलेश जेजूरकरचं डॉक्टर मैत्रिण स्वाती चव्हाणशी काय चॅटिंग व्हायचं? मोबाईल फॉरेन्सिककडे, दोघं एकत्रच मध्यवर्ती कारागृहात“प्रकृती सुधारण्याच्या दृष्टीने पुढील काही दिवस महत्त्वाचे आहेत. तो अतिदक्षता विभागात (ICU) डॉक्टरांच्या सतत देखरेखीखाली असून त्यांना सर्वसमावेशक आणि विशेष वैद्यकीय उपचार दिले जात आहेत,” असे डॉक्टरांनी सांगितले.