• Sat. Jun 6th, 2026
    Ashok Kharat : अशोक खरात प्रकरण; पोलिसांकडून न्यायालयात नवीन माहिती, कोठडीत पाच दिवसांची वाढ, तपासाचे प्रमुख मुद्दे कोणते?

    Nashik Ashok Kharat Case : खरातविरुद्ध सहा अत्याचाराचे गुन्हे नोंद असल्याची माहिती ‘एसआयटी’ने दिली असली तरी न्यायालयात फक्त १७ मार्च रोजी सरकारवाडा पोलिसांत दाखल गुन्ह्यातील मुद्दे, पीडितेच्या फिर्यादीवरून युक्तिवाद झाला. खरातच्या इतर ‘कुकर्मां’बाबत सबळ पुरावे प्राप्त होत असून, पुढील काही दिवसांत त्याचा पाय आणखी खोलात जाण्याची चिन्हे आहेत.

    सिन्नर अशोक खरात प्रकरण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : दैवी शक्ती, मंत्र-तंत्र आणि भविष्यवाणीच्या भीतीतून महिलांवर अत्याचार करणाऱ्या अशोक खरात याने नरबळी दिल्याचा किंवा खून केल्याचा दाट संशय असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी मंगळवारी नाशिक जिल्हा न्यायालयात दिली. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने खरातच्या पोलिस कोठडीत २९ मार्चपर्यंत वाढ केली. खरातवर हल्ला होण्याच्या शक्यतेमुळे न्यायालयात पोलिसांनी कडेकोट सुरक्षा ठेवली होती. यावेळी दोन आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

    तपासातील मुद्दे स्पष्ट

    विवाहित महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याच्या गुन्ह्यात १८ मार्चपासून नाशिक पोलिसांच्या कोठडीत असलेल्या संशयित खरातची सात दिवसांची पोलिस कोठडी संपल्याने मंगळवारी (दि. २४) दुपारी साडेचारला त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश तथा अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी के. एच. पाटील यांच्या न्यायकक्षात युक्तिवाद झाला. सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता शैलेन्द्र बागडे, तर संशयिताकडून सचिन भाटे यांनी युक्तिवाद केला. त्यावेळी पीडितेच्या वतीने एम. वाय. काळे यांनी भूमिका मांडली. कायदा व सुव्यवस्था विभागाने या प्रकरणात नेमलेल्या विशेष तपास पथकाचे (एसआयटी) पोलिस उपअधीक्षक किरणकुमार सूर्यवंशी यांनी तपासातील मुद्दे स्पष्ट केले.
    Maharashtra TimesAshok Kharat : अंकशास्त्रज्ञ म्हणवणारा अशोक खरात दहावीला गणितात नापास, शाळेतलं मूळ नाव ‘लक्ष्मण’, 1995 नंतर गौडबंगाल
    दरम्यान, खरातविरुद्ध सहा अत्याचाराचे गुन्हे नोंद असल्याची माहिती ‘एसआयटी’ने दिली असली तरी न्यायालयात फक्त १७ मार्च रोजी सरकारवाडा पोलिसांत दाखल गुन्ह्यातील मुद्दे, पीडितेच्या फिर्यादीवरून युक्तिवाद झाला. खरातच्या इतर ‘कुकर्मां’बाबत सबळ पुरावे प्राप्त होत असून, पुढील काही दिवसांत त्याचा पाय आणखी खोलात जाण्याची चिन्हे आहेत.

    तपासाचे प्रमुख मुद्दे

    संशयिताच्या फार्महाउसच्या झडतीने पिस्तुल व २१ जिवंत काडतुसे सापडली. याव्यतिरिक्त ‘फायर’ केलेल्या काडतुसांच्या पाच पुंगळ्याही जप्त तयार करण्यात आल्या. संशयिताने पिस्तुलाचा वापर एखाद्याची जीविहतानी, खून अथवा नरबळी देण्यासाठी केला असावा, असा पोलिसांना संशय आहे. तसेच संशयित भोंदू असून दैवी शक्ती, मंत्र-तंत्र, धार्मिक विधीच्या नावे आणखी गैरप्रकार केल्याचा संशय आहे. वास्तूदोष काढण्यासाठी खरात नागरिकांना पांढरी कस्तुरी, गावठी चिंचोका व यंत्र देत होता. हे साहित्य तो कोठून आणायचा, यासह हरणांची काळी व पांढरी कस्तुरी त्याने कोठून आणली, याबाबतही तपास सुरु आहे.
    Maharashtra TimesMumbai News: देशात पहिल्यांदाच ‘इच्छामृत्यू’, ‘बीएमसी’कडे आणखी 40 जणांचे अर्ज; पण स्पष्टता नसल्याने पालिका पेचात

    नाशिक पोलिसांवर विश्वास

    खरातविरुद्धचा ‘पेन ड्राइव्ह’ घेऊन एक फिर्यादी राज्यातील अनेकांकडे गेला. त्याने या प्रकरणाचा वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु, अनेकांनी पुराव्यांचा गैरवापर करून खरातकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. अखेर फिर्यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचला. तेथून कारवाईची सूत्रे फिरविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुख्यमंत्र्यांकडून सूचना मिळताच नाशिक शहर पोलिसांत पीडितेची फिर्याद नोंद झाली. तातडीने गुंडाविरोधी पथकाला पाचारण करून ‘सिनेस्टाइल’ पद्धतीने खरातला अटक झाली. त्यानंतर राज्यभरातून खरातच्या ‘कुकर्मां’चे दाखले उघड झाले. याप्रकरणी नाशिक पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुंडाविरोधी पथकाला सन्मानित केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्णिक यांच्यासह सहाय्यक आयुक्त संदीप मिटके, वरिष्ठ निरीक्षक अंचल मुदगल, उपनिरीक्षक संदीप पवार यांच्या पथकाची प्रशंसा केली.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा