Passive Euthanasia: देशात पहिल्यांदाच हरिश राणा या व्यक्तीला इच्छामृत्यूची परवानगी देण्यात आली. त्याने मंगळवारी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर हा विषय पुन्हा चर्चेत आला असून गेल्या दोन वर्षांत महापालिकेकडे 40 जणांचा अर्ज आले आहेत हे समोर आले.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म.टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने इच्छामरणासंदर्भात २०२३मध्ये दिलेल्या निर्णयानंतर राज्य सरकारच्या निर्देशावरून मुंबई महापालिकेने विविध प्रभागांतील मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे यासाठीचे अर्ज स्वीकारण्याची जबाबदारी दिली. त्यानुसार पालिकेकडे आत्तापर्यंत ४० जणांनी इच्छामरणासाठी अर्ज सादर केले आहेत. मात्र, यासंदर्भात कोणतीही सुस्पष्टता नसल्याने या अर्जांचे पुढे काय करावे, ते मार्गी कसे लावावेत, असा पेच पालिका प्रशासनापुढे निर्माण झाला आहे. हरिश राणा याच्या इच्छामरणानिमित्त हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.
दोन वर्ष उलटूनही निश्चित कार्यपद्धती नाही
‘व्याधिग्रस्त किंवा उपचारांनंतरही आयुष्याची खात्री नसलेल्या रुग्णांना जीवन नाकारण्याचा अधिकार असावा’, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने २०२३मध्ये दिला होता. त्यानंतर राज्य सरकारने ४३८ अभिरक्षकांची (कस्टोडिअन) नियुक्ती केली, तर मुंबई महापालिकेनेही विविध प्रभागांतील मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे अर्ज स्वीकारण्याची जबाबदारी सोपवली. मात्र, या अर्जांसंदर्भात कायदेशीर, तांत्रिक बाजूसंदर्भात योग्य वेळ आल्यानंतर कसा निर्णय घ्यायचा, याबाबत जवळजवळ दोन वर्षे सुनिश्चित अशी कार्यपद्धती नसल्याने या अर्जांवर काहीच निर्णय झालेला नाही. डॉ. निखिल दातार यांनी यासंदर्भात कायदेशीर लढा देऊन पाठपुरावा केल्यामुळे कार्यपद्धती निश्चित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.Harish Rana: देशातील पहिला इच्छामृत्यू! हरीश राणाची प्राणज्योत मालवली; 13 वर्षांपासूनच्या त्रासातून मुक्तता
पोर्टल तयार केलं
वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, इच्छामरणाबाबत अनेक तांत्रिक व वैद्यकीय पेच आहेत. मुंबईमध्ये अर्ज सादर केलेल्या व्यक्तीचा मुंबईबाहेर मृत्यू झाला तर त्यावेळी कोणत्या प्रशासकीय यंत्रणेने निर्णय घ्यायचा, हा मुद्दा अनुत्तरित आहे. अशा अर्जांची डिजिटल नोंद करण्यासाठी सरकारच्या शहरी विकास विभागाने पोर्टल तयार केले होते. त्याची अंमलबजावणी अद्याप महापालिका स्तरावर झालेली नाही. पालिकेने त्यासाठी वेगळे पोर्टल तयार करण्याची गरज काही डॉक्टरांनी व्यक्त केली.
मात्र, सरकारचे पोर्टल तयार असताना पुन्हा नवे पोर्टल कशासाठी हवे, असा प्रश्न पालिका प्रशासनाकडून उपस्थित केला जात आहे. सरकार याबाबत तोडगा काढेल, या विश्वासाने पत्रव्यवहार करूनही हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. ‘इच्छामरणाशीसंबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे सरकारने इच्छाशक्ती आणि सकारात्मकतेने द्यायला हवीत. त्यासाठी आवश्यक ती यंत्रणा राबवायला हवी’, असे मत डॉ. दातार यांनी मांडले.
Harish Rana: 10 दिवसांपासून अन्न-पाणी बंद, तरीही प्रकृती स्थिर; हरीश राणाला पाहून AIIMSचे डॉक्टर बुचकळ्यात
प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञान आणि त्याची वाढती व्याप्ती लक्षात घेता, अर्ज स्वीकारल्यानंतर पुढील काही वर्षांत ही प्रक्रिया कशी राबवण्यात येईल, यासंदर्भात संदिग्धता आहे. या अर्जांचे डिजिटायझेशन करणे, वैद्यकीय तंत्रज्ञानामध्ये होणारी प्रगती आणि व्यक्तीचे आयुर्मान लक्षात घेऊन यात प्राधान्याने बदल करण्याची गरजही वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा