Talegaon-Shikrapur Highway: पुण्यातील वाढती वाहतूककोंडी आणि अपघातांची संख्या लक्षात घेत पुण्यात अनेक प्रकल्पांवर काम सुरू आहे. त्यापैकी तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाला मंजुरी मिळाली असून सुतारवाडी ते देहूरोड 16 किमी उन्नत मार्ग प्रस्तावित आहे.
म.टा. प्रतिनिधी, मुंबई: पुण्यातील नवले पूल परिसरात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सुमारे सहा हजार कोटी रुपयांचा उन्नत मार्ग केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत दिली. दरम्यान, सुतारवाडी ते देहूरोड हा सुमारे १६ किलोमीटरचा उन्नत मार्ग प्रस्तावित असल्याचे कदम यांनी स्पष्ट केले. दरम्यान, तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गालाही मंजुरी देण्यात आली आहे.
आमदार भीमराव तापकीर यांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. या वेळी आमदार शंकर जगताप, आमदार बापू पठारे यांनी चर्चेत सहभाग घेतला. स्वामी नारायण मंदिर ते सनसिटी वारजे या दरम्यानच्या प्रस्तावित उन्नत मार्गाची सद्यस्थिती आणि त्यासाठी येणारा खर्च किती याची माहिती तापकीर यांनी विचारली होती. वाकड ते देहूरोड या दरम्यान उन्नत मार्ग तयार करण्यात येणार का, अशी विचारणा जगताप यांनी केली होती.
यावर कदम म्हणाले, ‘संबंधित राष्ट्रीय महामार्गाचा सुमारे पाच ते सहा किलोमीटरचा भाग तांत्रिकदृष्ट्या संवेदनशील आहे. ग्रामीण भागातून शहराकडे येणाऱ्या जड वाहनांमुळे येथे वाहतूक कोंडी होते आणि त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर हा उन्नत मार्ग प्रस्तावित आहे.’ तात्पुरत्या उपाययोजनांबाबत माहिती देताना कदम म्हणाले, ‘संबंधित ठिकाण ब्लॅक स्पॉट म्हणून घोषित करण्यात आले आहे. येथील सेवा रस्त्याची रुंदी सात मीटरवरून १०.५ मीटरपर्यंत वाढविण्यात आली आहे. वेगमर्यादा ६० किमीवरून ४० किमी प्रतितास करण्यात आली आहे.’
तळेगाव-शिक्रापूर महामार्गाला मंजुरी
पुणे जिल्ह्यातील वाढत्या वाहतूक कोंडीवर दिलासा देण्यासाठी तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या उन्नतीकरणाला हिरवा कंदील मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनात पार पडलेल्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत या प्रकल्पाला मान्यता दिली. या बैठकीस उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मुख्य सचिव राजेश अग्रवाल; तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Pune Metro: पुणे मेट्रोच्या बोगद्याला खड्डा, परवानगीविना स्थानकाजवळ बोअरवेलचं काम; मुंबईनंतर पुण्यातही तोच प्रकार
तळेगाव ते चाकण (० ते २६ किमी) दरम्यान चार पदरी उन्नत, तसेच चार पदरी समांतर रस्ता; तसेच चाकण ते शिक्रापूर (२६ ते ४३ किमी) दरम्यान चार पदरी महामार्ग उभारण्यास मंजुरी देण्यात आली. हा प्रकल्प ‘डीएफबीओटी’ (डिझाइन, फायनान्स, बिल्ट, ऑपरेट अँड ट्रान्सफर) पद्धतीने राबविण्यात येणार आहे. सद्यस्थितीत ४३ किलोमीटर लांबीच्या मार्गाचा विकास करण्यात येणार आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा