मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या लढ्याला पाठिंबा दिला आहे. आरक्षणासाठी सर्वांनी आंदोलनात सहभागी व्हावं, असं आवाहन जरांगेंनी धनगर समाजाला केलंय. धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी दीपक बोऱ्हाडे यांनी मुंबईत आझाद मैदानावर आंदोलनाला सुरुवात केलीय. अशातच जरांगेंनी उपोषणस्थळी भेट दिली आणि धनगर समाजाला शब्दही दिला.