• Sun. Jun 7th, 2026

    Ashok Kharat: मुख्यमंत्री होण्यासाठी भाजपच्या नेत्याने अशोक खरातकडून अघोरी पूजा केलेली; हर्षवर्धन सपकाळांच्या दाव्याने खळबळ

    Ashok Kharat: मुख्यमंत्री होण्यासाठी भाजपच्या नेत्याने अशोक खरातकडून अघोरी पूजा केलेली; हर्षवर्धन सपकाळांच्या दाव्याने खळबळ

    Congress Harshvardhan Sapkal: अशोक खरात प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलेलं असतानाच काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी खळबळजनक दावे केले आहेत.

    मुख्यमंत्री होण्यासाठी भाजपच्या नेत्याने अशोक खरातकडून अघोरी पूजा केलेली; हर्षवर्धन सपकाळांच्या दाव्याने खळबळ(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या प्रकरणात राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी खळबळजनक आरोप केले आहेत. “भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांचे या अशोक खरातसोबत अत्यंत जवळचे संबंध होते. चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री होण्यासाठी अशोक खरातकडून अघोरी पूजा केल्याची माहिती मिळत आहे,” असा दावा सपकाळ यांनी केला आहे.

    हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून अशोक खरात प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. “सरकारने भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात प्रामाणिकपणे कारवाई केली तर डझनभर मंत्री व दोन डझन अधिकारी जेलमध्ये जातील. अशोक खरातच्या इशानेश्वर मंदिराला देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने २०१८ साली १.५ कोटी रुपयांचा निधी दिला होता. फडणवीसांच्या कार्यालयात त्यावेळी कार्यरत असणारे व आता म्हाडाचे अधिकारी मिलिंद बोरीकर यांचे ही या बाबांशी अत्यंत जवळीकीचे संबंध आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचेही भोंदू सोबत फोटो समोर आले आहेत,” असा हल्लाबोल सपकाळ यांनी केला आहे.

    मित्रपक्षाकडून फडणवीसांचं मुख्यमंत्रिपद घालवण्यासाठी अघोरी पूजा?

    देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणाबद्दल आधीच माहिती होती, असा दावाही हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. “भोंदूबाबाचे कारनामे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सहा महिन्यांपासून माहीत होते. मुख्यमंत्र्‍यांच्या आजूबाजूचे लोक, मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचे अशोक खरातशी संबंध असल्यानेच माहिती मिळूनही त्यांनी काही कारवाई केली नव्हती. पण फडणवीस यांच्या मित्रपक्षातील सहकाऱ्यांनीच त्यांचे मुख्यमंत्रिपद घालवण्यासाठी अशोक खरातकडून तंत्र-मंत्र आणि अघोरी पूजा केल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अशोक खरात याच्याविरोधात कारवाई सुरू केली,” असा दावा सपकाळ यांनी केला आहे.

    दरम्यान, अशोक खरातच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता महायुतीतील मित्र पक्ष आणि आपल्याच पक्षातील हितशत्रूंना ब्लॅकमेल करत आहेत,” असा आरोपही हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा