Pune Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. एका तरुणाला रस्त्यात अडवून मारहाण करण्यात आली आहे.
बिबडेवाडी तरुणाला मारहाण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
स्नेहल निमगिरे, पुणे : ‘माझ्या मानलेल्या बहिणीला का छेडतो?’, असा जाब विचारत टोळक्याने एका तरुणावर निर्घृण हल्ला केल्याची धक्कादायक घटना बिबवेवाडी परिसरात घडली. या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला असून पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे, तर तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं आहे. ही घटना २२ मार्च रविवारी रोजी दुपारी सुमारे पावणेचारच्या सुमारास बिबवेवाडी येथील महेश सोसायटी चौकातील आराधना स्वीटसमोर घडली. जखमी तरुणाचं नाव हरीश विनोद कदम (वय २०, रा. लोअर इंदिरानगर) असं असून त्याने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
नेमकी घटना काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरीश हा आपल्या आईला कामावरून घरी घेऊन जाण्यासाठी गेला होता. आईसोबत पायी घरी जात असताना अचानक काही जणांनी त्याला अडवलं. त्यातील एका अल्पवयीन मुलाने त्याला ‘माझ्या बहिणीला का छेडतो?’, असा जाब विचारला. त्यानंतर क्षणात वाद वाढला आणि टोळक्याने त्याच्यावर हल्ला चढवला. साहिल संतोष बेंद्रे (वय १८) आणि तुषार अमित तळेकर (वय १९) यांनी इतर साथीदारांसह हरीशला जमिनीवर पाडून काठ्यांनी मारहाण केली. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी तसेच दगडाने डोक्यावर, पाठीवर, छातीवर आणि पोटावर जोरदार प्रहार करण्यात आले. या हल्ल्यात हरीश गंभीर जखमी झाला.
परिसरात भीतीचं वातावरण
घटनेची माहिती मिळताच बिबवेवाडी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत बेंद्रे आणि तळेकर यांना अटक केली. तसेच या गुन्ह्यात सहभागी असलेल्या तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार गायकवाड करत असून, परिसरात या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. दिवसेंदिवस शहरातील गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे. मात्र गुन्हेगारीतील अल्पवयीन आरोपींची संख्याही वाढत असल्यामुळे नागरिकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण होत आहे. अल्पवयीन मुले हातात पुस्तकांऐवजी पिस्तुल, कोयते घेऊन गुन्हेगारीला प्राधान्य देत असल्याचं शहराचं भयंकर चित्र पुढे दिसत आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा