• Tue. Sep 8th, 2026
Rohit Pawar : रोहित पवारांनी १६ फ्रेब्रुवारीचं पत्र बाहेर काढलं, पटेल-तटकरेंवर गंभीर आरोप; पक्ष ताब्यात घेण्याचा दावा

Rohit Pawar on Praful Patel and Sunil Tatkare : शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत मोठमोठे दावे केले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.

रोहित पवार ऑन सुनील तटकरे प्रफुल पटेल(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत मोठे दावे आणि आरोप केले आहेत. रोहित पवारांनी म्हटलं आहे की, ‘अजित पवारांच्या निधनानंतर अवघ्या १८व्या दिवशी म्हणजेच १६ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रफुल पटेल , सुनील तटकरे आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र दिलं. या पत्राद्वारे त्यांनी पक्षाच्या संविधानात बदल केल्याचं खोटं सांगितलं आणि पक्षाचे सर्व अधिकार कार्याध्यक्षांना म्हणजे प्रफुल पटेलांना देण्याची मागणी केली. हे करताना त्यांनी सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवार यांना विश्वासात घेतलं नव्हतं. सुनेत्रा पवार जेव्हा पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या, तेव्हा त्यांना या पत्रव्यवहाराची कुणकुण लागली असावी. म्हणूनच त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून २८ जानेवारी ते त्यांच्या अध्यक्षपदापर्यंत झालेला कोणताही पत्रव्यवहार ग्राह्य धरू नये’, अशी विनंती केली आहे.

रोहित पवार काय म्हणाले?

‘काही दिवसांपूर्वी अजितदादा पक्षाची काही कागदपत्रे समोर आली आहेत. हा कागद १० मार्च २०२६ आहे, यामध्ये सुनेत्रा काकी यांचं एक महत्वाचं वाक्य आहे. अजितदादा यांचा अपघात ते पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष होईपर्यत जो पत्रव्यवहार निवडणूक आयोगाला केला जाईल तो ग्राह्य धरू नये. १६ फेब्रुवारीला एक पत्र अजितदादा पक्षाचे निवडणूक आयोगाला देण्यात आले होते, त्यात सह्या प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या आहेत. ज्यामध्ये लिहिलं होतं की, आमचा पक्षाचं संविधान बदललं आहे. जर पक्षाला राष्ट्रीय अध्यक्ष नसेल तर नॅशनल वर्किंग प्रेसिडेंटकडे ताकद असेल, असं या पत्रात म्हटलं गेलं होतं. सर्व निर्णय हे ते घेतील असं या पत्रात म्हटलंय. कोण होतं नॅशनल वर्किंग प्रेसिडेंट? प्रफुल पटेल होते. यामध्ये सर्व अधिकार वर्किंग प्रेसिंडेट यांच्याकडे असावे, असं या पत्रात होतं. पण हे पत्र जेव्हा सुनेत्रा काकींना कळल्यावर सुनेत्रा काकींनी आयोगाला पत्र दिलं, राष्ट्रीय अध्यक्ष होपर्यत कोणताही पत्र विचारात घेऊ नये’, असंही रोहित पवारांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.
Maharashtra TimesPune Crime : ‘माझ्या बहिणीला का छेडतो?’, आईसोबत जाताना तरुणाला घेरलं, माऊलीसमोर पुण्यात लेकाला बेदम मारहाण

…तेव्हा त्यांनी सांगितलं

‘सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल आणि भाजपच्या काही नेत्यांनी जय पवार यांची पत्रकार परिषद दाबली. त्यांच्या दबावामुळे ही पत्रकार परिषद झाली नाही, असं मला वाटतं. माझं जयशी बोलणं झालं नाही. व्हीएसआर कंपनीला वाचविण्याचं काम सुरु आहे. या कंपनीला अपघातानंतर सुद्धा ८० ते ९० कोटी रुपये दिले. राहुल गांधी यांची मी जेव्हा भेट घेतली तेव्हा त्यांनी सांगितलं जिथे तुला न्याय मिळेल त्या राज्यात तुझी FIR कर त्यामुळे आम्ही कर्नाटकात गेलो आणि तिथे झिरो एफआयआर झाला’, अशी माहिती देखील रोहित पवारांनी यावेळी बोलताना दिली आहे.

सुनेत्रा काकींना सांगायचंय…

‘पियुष गोयल यांनी प्रफुल पटेल हे पक्षाचे अध्यक्ष झाल्याचं दिलेलं विधान आणि त्यानंतर त्यांनी ते ‘चुकीने बोललो’ असं सांगणं, हा घटनाक्रम संशयास्पद वाटतो, असंही ते यावेळी म्हणाले. पण आधीच नेत्यांमध्ये ठरलं होतं की, पक्षाचा कंट्रोल प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांना घ्यायचा होता. यांना अख्खी पार्टी आपल्याकडे हवी होती. सुनेत्रा काकींना सांगायचंय की, राजकारण लय वंगाळ झालं आहे. सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी सांगितलं होतं की, अधिवेशनात कोणीही अजित पवार यांच्या अपघाताबद्दल बोलायचं नाही, म्हणून काही आमदार सोडले तर कोणीही सभागृहात याबद्दल बोलत नव्हते. जय पवार हे पत्रकार परिषद घेणार होते, त्याचं काय झालं. ती पण पत्रकार परिषद झाली नाही’, असंही म्हणत रोहित पवारांनी विरोधकांना चांगलंच धारेवर धरलं.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा