Nashik Crime: पीडितेने त्याला विरोध केला असता, जर मला विरोध केला आणि याबाबतची वाच्यता जर कोणाकडे केली तर मी माझ्या दैवी शक्तीने तुझे आणि तुझ्या घरच्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करून टाकीन आणि तुझ्या वडिलांचा लवकरच मृत्यू होईल, अशी भीती घातली होती.
करिअरचा सल्ला विचारण्यासाठी गेलेल्या तरुणीवर खरातकडून अत्याचार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
जयेश साबळे, नाशिक : भविष्य सांगण्याच्या नावाखाली महिलांवर अत्याचार करणाऱ्या अशोक खरात याच्या प्रकरणात आता आणखी एका पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल झाला आहे. खरात प्रकरणात पीडित महिलांची संख्या वाढत चालली असून पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन पीडिता पुढे येत आहे. पोलिसांकडून देखील न घाबरता अशोक खरात याच्याविरोधात काही तक्रार असेल तर पुढे येऊन त्याबाबत तक्रार नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
पीडित तरुणीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, पीडित आणि तिच्या कुटुंबीयांनी अशोक खरात याच्या ओकस प्रॉपर्टी येथे घरगुती समस्येसाठी भेट घेतली होती. त्यावर खरात याने पीडिता आणि तिच्या घरच्यांना ४-५ वेळा भेटण्यासाठी बोलावले होते. असे असताना एक दिवशी त्याने विषय भरकटवून वेगळ्या विषयावर बोलण्यास सुरुवात केली. त्यांनंतर पीडितेने करिअर संदर्भात खरात याला विचारले असता, खरात याने तिच्या घरच्यांना बाहेर जाण्यास सांगून त्यानंतर पीडितेला तांब्याच्या भांड्यात पाणी पिण्यासाठी दिले आणि सदर भांडे हे डोक्यावर ठेवण्यास सांगितले. त्यानंतर त्याने पीडितेसोबत जवळीक करून, मी महादेवाचा अवतार आहे, माझ्याकडे दैवी शक्ती आहे, मी तुझे चांगले करिअर घडवेल, असे बोलून त्याने पीडितेला काहीतरी मंत्र बोलण्यास सांगितले आणि तिचे शोषण करण्यास केली. या नराधमाने पीडितेचे जुलै २०२४ ते डिसेंबर २०२४ पर्यंत शारीरिक शोषण केले.
पीडितेच्या मोबाईल क्रमांकावर एका अनोळखी नंबरवरून खरातसोबतचा एक अश्लील व्हिडिओ पाठवण्यात आला. त्यानंतर पीडितेने खरात याच्याशी संपर्क साधला असता त्याने सदर व्हिडिओ हा AI ने बनवला असून, याबाबत पोलिसांत तक्रार देण्यासाठी सांगण्यात आले. त्याने पुन्हा पीडितेला एकटीला बोलावून घेऊन तिला पुन्हा त्याने तिच्यासोबत केलेल्या गैर कृत्याबाबत कोणाला सांगितले तर , ‘तुझ्या वडिलांच्या जीवाला धोका निर्माण होऊन, ते तत्काळ मरून जातील ‘, अशी भीती घातली होती.
दरम्यान, आता अशोक खरात याचे कारनामे समोर आल्यानंतर पीडितेने धाडस दाखवत पोलिस ठाणे गाठले आणि खरातविरोधात अत्याचार केल्या प्रकरणी तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिस ठाण्यात खरातविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून अधिक चौकशी केली जात आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा