Nashik Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच नाशिकमधल्या मालेगावमध्ये पुन्हा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात भितीचं वातावरण पसरलं आहे.
मालेगाव जुन्या वादातून तरुणाची हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
म. टा. प्रतिनिधी : मागील भांडणाची कुरापत काढून शेख सलीम शेख चांद उर्फ मोहम्मद मोट्या (वय ३२) याच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा निर्घृणपणे खून केल्याची घटना घडली. या हाणामारीत एक जण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी सात जणांविरुद्ध पवारवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत सलीम शेखचा भाऊ शेख हनिफ चांद उर्फ राजू यांनी पवारवाडी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
जुन्या भांडणाची कुरापत
शहरातील अख्तराबाद भागात मंगळवारी (दि. २४) मध्यरात्री हा खुनाचा प्रकार घडला. सात ते आठ संशयितांनी हातात लाठ्या, काठ्या, कोयते, तलवार घेऊन फिर्यादी हनिफ यांचा भाऊ व त्याचा एक मित्र बिडी गोडावून अख्तराबाद येथे उभे असताना त्यांच्याजवळ जाऊन मागील भांडणाच्या कुरापतीतून धारदार तलवारीने सलीमच्या डोक्यावर मारहाण केली. तसेच अन्य जणांनी हातातील कोयत्याने सलीमच्या डोक्यावर व हातापायावर मारहाण केली. या गंभीर मारहाणीत सलीमचा मृत्यू झाला. साक्षीदार फैयाज अहमद मोहमद आमीन (रा. बडा कब्रस्तान, ५२ खोली) याला संशयित आरोपींनी जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्या डोक्यावर, उजव्या पायावर, डाव्या हातावर कोयत्याने, तलवारीने व लाठ्या-काठ्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Ashok Kharat Property: खरातकडे डोळे दिपवून टाकणारी संपत्ती; ६३ एकर जमीन, बंगला अन् फार्म हाऊस ; आकडा तब्बल ४० कोटींवर! दरम्यान, याप्रकरणी संशयित मतीन मुल्ला, कलिम मतीन मुल्ला उर्फ कलिम नाट्या, शोएब अली, बिलाल, रियाज मोहम्मद, रिजवान, सैफ अली, (पूर्ण नाव माहीत नाही) सर्व रा. अख्तराबाद, मालेगाव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी कॅम्प विभागाचे सहायक पोलिस अधीक्षक दर्शन दुग्गड, पोलिस निरीक्षक आर. एस. खताळ यांनी भेट देऊन पाहणी केली. Ajit Pawar: अजित पवारांच्या प्रकरणात महाराष्ट्रात FIR घेईनात, रोहित पवारांनी शक्कल लढवली; थेट कर्नाटकात तक्रार दाखल, तपास होणार
नाशिकमधील बालिकेला अत्याचार करुन संपवलं
लहान मुलीवरील अत्याचार व हत्येच्या अत्यंत गंभीर गुन्ह्याच्या संवेदनशील खटल्यातील मुख्य आरोपीला कनिष्ठ न्यायालयाने त्याची बाजू कायदेशीर प्रक्रियेप्रमाणे मांडण्याची संधीच दिली नसल्याचा विपरित परिणाम झाल्याचे मंगळवारी समोर आले. नाशिकमधील विशेष पोक्सो न्यायालयाने आरोपी विलास महाले याला सुनावलेली फाशीची शिक्षाच रद्द करुन संपूर्ण खटला नव्याने चालवण्याचा आदेश देण्याची वेळ मुंबई उच्च न्यायालयावर आली. परिणामी, पीडित कुटुंबातील व्यक्तींना आता पुन्हा खटल्यातील साक्ष व उलट तपासणीला सामोरे जावे लागणार आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा