Pune MBA Student Death : मेसमधील वॉटर फिल्टरचे बटण दाबल्यानंतर चैतन्यने नळाला हात लावताच त्याला विजेचा जोरदार धक्का बसला.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
स्नेहल निमगिरे, पुणे : भोजनालयात विजेचा धक्का लागून एमबीएच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील कृषी महाविद्यालय येथील ‘विद्यार्थी सहकारी भोजनालयात’ १४ मार्च २०२६ रोजी दुर्दैवी घटना घडली. मयत चैतन्य कुंडलिक चव्हाण हा कृषी व्यवसाय व्यवस्थापन (एबीएम) प्रथम वर्षाचा विद्यार्थी होता. या घटनेनंतर महाविद्यालयातील सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून विद्यार्थ्यांमध्ये भीती आणि संतापाचं वातावरण आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, मेसमधील वॉटर फिल्टरचे बटण दाबल्यानंतर चैतन्यने नळाला हात लावताच त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. काही विद्यार्थ्यांनी सांगितले की, उपकरणात विद्युत प्रवाह आल्याने ही दुर्घटना घडली असावी. या घटनेमुळे मेसमधील विद्युत सुरक्षिततेबाबत मोठा निष्काळजीपणा झाल्याचा आरोप केला जात आहे.
कोण होता चैतन्य चव्हाण ?
चैतन्य चव्हाण हा बीड जिल्ह्यातील आष्टी गावातील रहिवासी असून त्याची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. गेल्या पाच वर्षांपासून तो पुण्यातील कृषी महाविद्यालयात शिक्षण घेत होता. त्याच्या अकाली मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. Dog Attack : भटक्या कुत्र्याची झडप, वंशिकाताई धीराने लढली, स्वतः जखमी झाली, पण चिमुकल्या भावावर ओरखडाही नाही, अंबरनाथमधील घटना
विद्यार्थ्यांमध्ये चिंता
घटनेनंतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एकत्र येत शांततापूर्ण आंदोलन सुरु केलं असून चैतन्यला न्याय मिळावा, तसंच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.
Harshvardhan Sadgir | आता नोकरी नको, मी करून दाखवलं! एकनाथ शिंदेंचं नाव घेत सदगीरची खंत
दरम्यान, शॉक लागल्याच्या घटनेनंतर चार दिवसांनी विद्यार्थी संघटना ‘एबीव्हीपी’नेही सहव्यवस्थापकांना निवेदन देत सखोल चौकशीची मागणी केली होती. सीसीटीव्ही फुटेज तपासून जबाबदारांवर कारवाई करावी आणि संबंधितांना निलंबित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. Harish Rana : धाकट्या भावाकडून हरीशला मुखाग्नी; वडील म्हणाले, कुणी रडू नका, माझा लेक शांतपणे जगाचा निरोप घेईल
विद्यार्थ्यांचा कॉलेज आवारात ठिय्या
महाविद्यालय प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी सुरु असल्याचे सांगितले असून, आवश्यक ती कारवाई केली जाईल तसेच काही खर्चही उचलला जात असल्याचे स्पष्ट केलं होतं. मात्र, आता कॉलेजचे विद्यार्थ्यांनी दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे. आज जवळपास २०० ते ३०० विद्यार्थी महाविद्यालयाच्या आवारात बसून आंदोलन करत आहेत.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा