• Mon. Jun 8th, 2026

    उन्हाळ्यामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये वाढ, मुंबईहून कोकणात जाणाऱ्यांसाठी विशेष ट्रेन; सीएसएमटी-मडगाव अतिरिक्त फेऱ्या

    उन्हाळ्यामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये वाढ, मुंबईहून कोकणात जाणाऱ्यांसाठी विशेष ट्रेन; सीएसएमटी-मडगाव अतिरिक्त फेऱ्या

    Summer Special Trains: कोकण रेल्वेवर प्रवाशांच्या वाढत्या मागणीमुळे रेल्वेनं सीएसएमटी ते मडगावदरम्यान विशेष फेऱ्यांची घोषणा केली आहे. परंतु, केवळ 4 फेऱ्यांमुळे गर्दीवर नियंत्रण ठेवणं शक्य होणार आहे का असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

    म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: उन्हाळी प्रवासी मागणी लक्षात घेता मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगावदरम्यान ३ व ५ एप्रिलला चार विशेष फेऱ्यांची घोषणा केली आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस-नागपूर आणि पुणे-नागपूर मार्गावर प्रत्येकी दोन फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. विशेष फेऱ्यांचे आरक्षण मंगळवारपासून खुले झाले आहे.

    कसं असेल वेळापत्रक?

    गाडी क्रमांक ०११२९ सीएसएमटी येथून मध्यरात्रीनंतर १२.२० वाजता सुटेल आणि मडगाव येथे दुपारी ३.१५ वाजता पोहोचेल. परतीचा प्रवास (०११३०) मडगावहून दुपारी चार वाजता सुरू होईल आणि सीएसएमटी येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ३.४५ ला पूर्ण होईल. दादर, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी स्थानकांवर विशेष रेल्वे थांबणार आहे.Maharashtra TimesRailway Ticket Refund: रेल्वे तिकीटांच्या नियमांत बदल, आता 8 तासांपूर्वी तिकीट रद्द केल्यास ‘नो रिफंड’; एप्रिलपासून होणार लागू

    गाडी क्रमांक ०१०२१ एलटीटी-नागपूर ही ३ एप्रिलला मध्यरात्रीनंतर १२.५५ ला सुटेल आणि नागपूरला दुपारी ३.४५ ला पोहोचेल. परतीचा प्रवास (०१०२२) नागपूरहून त्याच दिवशी रात्री ८ वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११.४५ला एलटीटी येथे पूर्ण होईल. गाड्यांमध्ये वातानुकूलित, शयनयान आणि सामान्य डबे उपलब्ध आहेत. दरम्यान, मध्य रेल्वेकडून एप्रिल-मे महिन्यात गावी जाणाऱ्यांसाठी 1500 विशेष रेल्वे फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. यामध्ये निम्म्याहून अधिक फेऱ्या उत्तर भारतासाठी सोडल्यामुळे कोकणवासियांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

    भुयारी मेट्रोला ‘जायका’चे बळ

    वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया या मेट्रो ११ साठी भुयारी मार्ग निधीचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (एमएमआरसीएल) भुयारी मेट्रो प्रकल्पासाठी जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सीने (जायका) ५,५०० कोटींचा निधी मंजूर केला आहे. हा निधी कर्जाऊ स्वरूपात असणार आहे.

    Maharashtra TimesPune Metro: पुणे मेट्रोच्या बोगद्याला खड्डा, परवानगीविना स्थानकाजवळ बोअरवेलचं काम; मुंबईनंतर पुण्यातही तोच प्रकार

    नवी दिल्ली येथील अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाचे संयुक्त सचिव आलोक तिवारी आणि जायका, इंडियाचे प्रतिनिधी ताकेची ताकुरो यांनी करारावर स्वाक्षरी करून कर्ज मंजूर केले आहे. प्रकल्पाची एकूण किंमत सुमारे २३,४८७ कोटी आहे. जायकाकडून टप्याटप्याने निधी उपलब्ध होणार आहे. मुंबई फोर्ट परिसरासह, दक्षिण मुंबई आणि मुंबई ट्रान्स हार्बर लिंक यांना जोडणारा मेट्रो ११ हा महत्त्वाचा प्रकल्प असणार आहे. प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवण्यास चालना मिळेल.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा