• Sun. Jun 7th, 2026
    Nanded Crime : ‘मी संन्याशी आहे, लग्न करू शकत नाही’; नाशिकनंतर नांदेडमध्ये मठातील महाराजाचा महिलेवर अत्याचार

    Nanded Crime News : राज्यातील नाशिकमध्ये अशोक खरात प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. त्याचदरम्या, नांदेडमध्ये देखील असाच एक प्रकार उघडकीस आला आहे.

    संत हरीगीर दत्तगीर गिरी महाराज(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अर्जुन राठोड, नांदेड : नाशिकमधील कॅप्टन अशोक खरात प्रकरण राज्यभर गाजत असताना नांदेडमध्ये देखील असा एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका मठातील महाराजाचा हा कारनामा समोर आला आहे. लग्नाचं आमिष दाखवून एका महाराजाने ४७ वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याचं उघड झालं आहे. याप्रकरणी भाग्यनगर पोलिसांनी महाराजाला अटक करत गुन्हा दाखल केला आहे. नाशिकनंतर नांदेडमध्ये घडलेल्या या घटनेनं खळबळ उडाली आहे. संत हरीगीर दत्तगीर गिरी महाराज (वय ३८) असं अटक करण्यात आलेल्या महाराजाचं नाव आहे.

    नेमकं काय घडलं?

    नांदेड शहरातील गाडीपुरा भागात महंत बाळगीर महाराज मठ आहे. या मठाचे संत हरीगीर दत्तगीर गिरी महाराज प्रमुख आहेत. दर पौर्णिमा आणि अमावस्याला भाविक दर्शनासाठी मठात गर्दी करत असतात. भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पीडित महिला देखील १२ मे २०२५ रोजी मठात दर्शनसाठी गेल्या होत्या. यावेळी महाराज आणि पीडित महिलेशी ओळख झाली. महाराजाने महिलेचा मोबाईल नंबर घेतला, त्यानंतर दोघांमध्ये फोनवर संभाषण सुरु होतं. जून महिन्यात महिलेनं महाराजाला गुरु केलं.
    Maharashtra TimesRupali Chakankar: चाकणकरांना अटक करा, प्रदेशाध्यक्षपदावरून न हटवल्यास आम्हीच पक्ष सोडणार; ठोंबरेंचा आक्रमक इशारा

    ‘मी संन्याशी आहे…’

    दरम्यान, ‘माझा वाढदिवस आहे. शुभेच्छा देण्यासाठी तू माझ्या घरी ये’, असं तगादा महाराजाकडून लावला जात होता. शिवाय लग्नाचं आमिष दाखवून महाराजाने महिलेच्या घरी जाऊन शरीर सुखाची मागणी करत अत्याचार केला, असा आरोप पीडित महिलेनं केला आहे. लग्नाबाबत विचारणा केल्यानं ‘मी संन्याशी आहे, लग्न करू शकत नाही. पैसे घेऊन प्रकरण मिटवून घे’, अशी धमकी देखील दिली. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून भाग्यनगर पोलिसांनी कलम ६९, ३५१(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला. संशयित आरोपी संत हरीगीर दत्तगीर गिरी महाराज याला अटक करण्यात आली आहे.
    Maharashtra TimesFarmer Success Story: लाल नाही तर पिवळं कलिंगड! ‘पिक युअर ओन’चा अनुभव मिळणार; रायगडमध्ये कृषी पर्यटनाचा अनोखा प्रयोग

    ‘मास्टरमाइंड’ नीरज जाधवचा फोटो समोर

    नाशिकसह अवघ्या महाराष्ट्रात खळबळ उडवणाऱ्या ‘कॅप्टन फाईल्स’ अशोक खरात प्रकरणातील सर्वात मोठा आणि धक्कादायक कृत्याचा सूत्रधार दुसरा कोणी नसून संशयित अशोक खरातसोबत राहणारा ऑफिस बॉय नीरज जाधव असल्याचं उघड झालं आहे. त्याच ओजस प्रॉपर्टीजच्या बंद दाराआड 100 हून अधिक महिलांच्या लैंगिक शोषणाचे व्हिडिओ करून आपल्याच मालकाला 5 कोटींच्या खंडणीसाठी ब्लॅकमेल करणाऱ्या या मास्टरमाइंडचा फोटो आता समोर आला आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा