• Thu. Jun 18th, 2026
    बाबा प्रकरण भोवलं, रुपाली चाकणकरांचा राजीनामा, खरातविरोधात कारवाईची मागणी

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरण उघड झाल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली चाकणकर यांचं नाव सर्वाधिक चर्चेत आहे. रूपाली चाकणकर यांना हे भोंदू बाबा प्रकरण चांगलंच भोवलंय. सर्व स्तरातून झालेल्या टीकेनंतर चाकणकरांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. राजीनामा देण्यापूर्वी त्यांनी पोलीस महासंचलक सदानंद दाते यांची भेट घेऊन महिला आयोगाच्या वतीने कॅप्टन खरात प्रकरणी सखोल आणि उच्च स्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली. यानंतर चाकणकर मुख्यमंत्र्यांनाही भेटल्या आणि त्यांच्याकडे आपली भूमिका मांडली. तर मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर त्यांनी रात्री उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेत आपला राजीनामा सुपूर्द केला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed