Sushma Andhare on Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांना आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर सुषमा अंधारे यांनी आपल्या फेसबुक पोस्ट आणि व्हॉट्सॲप स्टेटस ठेवत चाकणकरांना पुन्हा एकदा डिवचलं आहे.
चाकणकरांचा आणि नैतिकतेचा सुतराम संबंध नाही…
‘चाकणकरांना जर स्वेच्छेने ने राजीनामा द्यायचा असता तर तो त्यांनी एक वर्षापूर्वी जेव्हा हे प्रकरण त्यांच्या कानावर आलं तेव्हाच किंबहुना किमान तीन दिवस आधी तरी तो राजीनामा दिला असता चाकणकर शेवटच्या क्षणापर्यंत पद वाचवण्यासाठी धडपडत राहिल्या. चाकणकरांना जरा जरी पश्चातापबुद्धी झाली असती तर त्या खरात ची अटक झाल्याबरोबर राजीनामा देऊन मोकळ्या झाल्या असत्या मुळात हा राजीनामा नाही ही हकालपट्टी आहे. चाकणकरांनी शब्दाची मलमपट्टी करून उगाच केविलवाणी धडपड करू नये. नुसता राजीनामा पुरेसा नाही. चाकणकरांवर गुन्हा दाखल करून त्यांना सह आरोपी करून आणि त्यांची अटक होणं जास्त गरजेचे आहे…’ अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून रुपाली चाकणकर यांच्यावर टीका केली आहे.
Sushma Andhare : ‘मोठमोठे गार केले गंमतमधी…’; सुषमा अंधारेंच्या WhatsApp स्टेटसची जोरदार चर्चा, रुपाली चाकणकरांना डिवचलं
सुषमा अंधारेंच व्हॉट्सऍप स्टेटसवर काय?
सुषमा अंधारे यांनी आपल्या व्हॉट्सऍप स्टेटसवर लिहिलं आहे, ‘मोठेमोठे गार केले गंमतमधी’, अशा शब्दात चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर सुषमा अंधारे यांच्या या दोन्ही पोस्टची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.
नेमकं प्रकरण काय?
अशोक खरातने तंत्र-मंत्रांसह धार्मिक आस्थेच्या नावाखाली स्त्रिया आणि त्यांच्या नातलगांना जिवाची भीती घालून शोषण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणासह राज्यातील इतर दोन गुन्ह्यांचा एकत्र तपास करण्यासाठी कायदा व सुव्यवस्था विभागाकडून विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. मनोज कुमार शर्मा यांच्या आदेशान्वये ‘एसआयटी’ नेमण्यात आली आहे. त्यानुसार राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक-१ च्या समादेशक तेजस्वी सातपुते (आयपीएस) यांनी तीन दिवसांपासून तपासाची सूत्रं हाती घेतली आहेत.
