Jalgaon Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्याचदरम्यान, जळगाव जिल्ह्यात एक भयंकर घटना समोर आली आहे. या घटनेनं संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील निमखेडी येथील नितीन सोनवणे आणि दिपाली सोनवणे मुलांसह वास्तव्याला आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांमध्ये वाद सुरू होता. हा वाद काल मराठी नवीन वर्षच्या दिवशीच म्हणजेच गुढीपाडव्यालाच दोघांमध्ये पुन्हा वाद सुरू झाला, आणि या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं. पती नितीन सोनवणे याने पत्नी दिपालीला लोखंडी विळ्याने सपासप वार करून ठार केलं.
Pune Friends Accident : लेह लडाखहून येताना अपघात, तिघा मित्रांवर ऐन गुढीपाडव्याला अंत्यसंस्कार, पिंपरी हळहळली, नेत्यांनाही भावना अनावर
निमखेडी येथील आरोपी पती नितीन विजय सोनवणे हा मयत पत्नी दिपाली सोनवणे आणि आपली दोन मुलं व एक मुलगी यांच्यासोबत निमखेडी गावात वास्तव्याला आहे. दोघेही बाहेर काम करून आपल्या घराचा उदरनिर्वाह करत होते. अनेक दिवसांपासून नितीन सोनवणे यांचे पत्नीशी कौटुंबिक वाद सुरू होते. मात्र, काल गुढीपाडव्याच्या दिवशी दुपारी पुन्हा या दोघांमध्ये वाद सुरू झाला आणि दोघांमध्ये झटापटी झाली. नितीन सोनवणे याने संतापाच्या भरात लोखंडी विळ्याने पत्नीच्या मानेवर आणि पोटावर वार करून तिची घरातच हत्या केली. गुढीपाडव्याच्या दिवशीच घरातील लक्ष्मीची हत्या करून घरात रक्ताचा सडा पडला.
Mumbai Local: मुंब्रा दुर्घटनेनंतर रेल्वेकडून बंद दरवाजांची लोकल, मध्य रेल्वेवर ‘नॉन-एसी’ ट्रेन लवकरच; एप्रिलमध्ये चाचणी
पोटचे तिघं मुलं अनाथ
निखिल सोनवणे याने पत्नीची हत्या केल्यानंतर स्वतःहून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला दिपालीचं पार्थिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलं आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन आणि दिपालीच्या पश्चात दोन मुलं आणि एक मुलगी आहे. तर नितीनची आई वयोवृद्ध असून एका डोळ्यानं त्यांना दिसत नसल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली आहे. या घटनेनंतर नितीन आणि दिपालीचे तिघं मुलं आता अनाथ झाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
