Dharmendra Pradhan : धर्मेंद्र प्रधानांना वाचवण्यासाठी सरकारने CJP ला दिलेली वेगळीच ऑफर; धक्कादायक दाव्यानंतर भाजपने काय खुलासा केला?
नीट पेपरफुटीप्रकरणी विद्यार्थ्यांनी नवी दिल्लीसह देशभर केलेल्या आंदोलनानंतर सरकारला झुकावं लागलं आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला. मात्र प्रधान यांच्या राजीनाम्याआधी दिल्लीत नाट्यमय घडामोडी घडल्याची माहिती समोर आली आहे. जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या ‘ कॉक्रोच जनता पार्टी ’ला केंद्र सरकारने तत्कालीन शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या खातेबदलाचा प्रस्ताव सुरुवातीला दिला होता. मात्र, ‘सीजेपी’ने हा स्वीकारण्यास नकार दिला, असे वृत्त समोर आले आहे. मात्र, हे वृत्त चुकीचे, निराधार व काल्पनिक असल्याचे भाजपने म्हटले आहे.