पावसाची भुरभूर आणि हलक्या सरी अधूनमधून हजेरी लावत असल्या, तरी अनेक दिवस मुसळधार पाऊस पडला नव्हता. गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढल्याचा अनुभव नागरिक घेत होते. कामटवाडे, सिडको, राजीवनगर, ठक्कर बाजार, कॉलेज रोड, गंगापूर रोडसह उपनगरांमध्ये टप्प्याटप्प्याने पाऊस धो-धो कोसळला. अवघ्या १५ मिनिटांत रस्त्यांवर पाणीच पाणी झाले. ठिकठिकाणी पाण्याची तळी साचली. त्यातून वाट काढताना नागरिकांची तारांबळ उडाली. सिंहस्थ कामांचीही अनेक ठिकाणी पोलखोल झाली. दरम्यान, जिल्ह्यात सोमवारी सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासांत ०.४ मिमी पाऊस नोंदविला गेला.
नाशिककरांनो कृपया लक्ष द्या! 3 महिने ‘या’ भागातील सिटीलिंकच्या मार्गात बदल; बसस्थानकाच्या कामामुळे निर्णय, कसे आहे नियोजन?गणेशोत्सवातही गर्दी आटली
गणेशोत्सवातील देखाव्यांचा आनंद लुटण्यासाठी शनिवार, रविवारी नागरिकांची मोठी गर्दी झाली. गणेशभक्तांच्या उत्साहाला उधाण आले होते. परंतु, सोमवारी पावसाने गणेशभक्तांच्या उत्साहावर पाणी फिरविले. बी. डी. भालेकर मैदान, रविवार कारंजा, अशोक स्तंभ, मेन रोड परिसरात तुरळक गर्दी होती. ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली.
एक्स्लो पॉइंट परिसरात पाणी
सिडको : सिडको, पाथर्डी व अंबड परिसराला मुसळधार पावसाने झोडपून काढले. गरवारे चौफुली ते एक्सलो पॉइंट डीपी रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू असताना पाण्याच्या निचऱ्याचे योग्य नियोजन न केल्याने एक्सलो पॉइंट चौकातील अनेक दुकानांत पाणी शिरले. यामुळे इलेक्ट्रिक साहित्य तसेच औद्योगिक कंपन्या व मशिनरीसाठी लागणारे रॉ मटेरियल विकणाऱ्या व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे. गरवारे चौफुली ते पपया नर्सरीदरम्यान रस्ता रुंदीकरण व काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. या कामात रस्त्याची उंची तब्बल दोन ते तीन फूट वाढविण्यात आली आहे. परिणामी लगतची दुकाने व कंपन्या रस्त्याच्या तुलनेत खोलगट झाल्याने भविष्यातही येथे पाणी साचण्याची भीती व्यक्त होत आहे.
Bribe Cases: ‘खाकी’त फोफावली खाबूगिरी; महसूल विभागात सर्वाधिक संशयित, राज्यात 3 कोटी तीन लाखांची लाचखोरी उघडसातपूरमध्ये रस्ते जलमय
सातपूर : सोमवारी दुपारी एकनंतर सातपूर भागात पावसाने दमदार हजेरी लावल्याने रस्ते जलमय झाले. त्यातच नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर सुरू असलेल्या कामामुळे वाहनचालकांना पाण्याने भरलेल्या रस्त्यावरून जाताना अडचणींचा सामना करावा लागला. कॉलनी परिसरातही दमदार पावसामुळे ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी तुंबले होते.
