Devendra Fadnavis: या निवासी प्रशिक्षणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः काही काळ उपस्थित राहून नगरसेवकांशी संवाद साधणार आहेत.
पुणे महापालिकेत भाजपने ११९ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळविले, तर पिंपरी-चिंचवडमध्येही भाजपने ८४ जागांसह सत्ता कायम राखली. एवढे मोठे संख्याबळ मिळाल्यानंतर नगरसेवकांच्या वाढलेल्या राजकीय महत्त्वाकांक्षा, स्थानिक नेत्यांमधील मतभेद आणि गटतटांचे राजकारण यामुळे पक्षांतर्गत व्यवस्थापनाचा प्रश्न अधिक महत्त्वाचा बनला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचे प्रशिक्षण रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, उत्तन येथे होणार आहे. पक्षाच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६ अंतर्गत राज्यातील विविध महापालिकांतील भाजप नगरसेवकांसाठी प्रशिक्षण शिबिरे सुरू आहेत. यापूर्वी झालेल्या प्रशिक्षणांमध्ये अर्थसंकल्प नियोजन, नागरी प्रश्नांचे निराकरण, संघटनात्मक शिस्त यांवर मार्गदर्शन करण्यात आले आहे.
Pune News : भल्यामोठ्या आयटी कंपनीत चांगला पगार, पण नको ते घडलं, इंजिनिअर तरुणाने गर्भवती पत्नीचा जीव घेतला, नंतर स्वत:ला संपवण्याचा प्रयत्नमुख्यमंत्र्यांकडून ‘धडे’ ?
पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या नगरसेवकांसाठी होणाऱ्या प्रशिक्षणात फडणवीस अर्धा दिवस उपस्थित राहण्याची शक्यता आहे. ‘सत्ता मिळवणे सोपे; मात्र ती शिस्तीने, एकजुटीने आणि स्वच्छ कारभारातून चालविणे हे खरे आव्हान,’ असा संदेश नगरसेवकांना देण्याची तयारी असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. महापालिकेतील पदे, समित्या आणि विविध विषयांवरून नगरसेवकांमध्ये स्पर्धा वाढण्याची शक्यता लक्षात घेता पक्षसंघटनेशी बांधिलकी, सामूहिक निर्णय आणि प्रशासनाशी समन्वय यावर प्रशिक्षणात भर दिला जाणार आहे.
Rain Update : ठाण्यात मुसळधार पाऊस, महाराष्ट्रातील 25 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट, नेमका अंदाज काय?मोहोळ यांनीही घेतला होता ‘वर्ग’
सत्ताधारी नगरसेवकांच्या कार्यपद्धतीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रारी वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ नऊ सप्टेंबरला पुण्यातील भाजपच्या नगरसेवकांची बैठक घेत कान टोचले होते. स्थानिक नेत्यांमधील मतभेदांबाबत ‘महाराष्ट्र टाइम्स’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर तातडीने ही बैठक झाली होती. महापालिकेतील प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये असलेला संवादाचा अभाव, नगरसेवकांकडून राजरोस होणारी निधीची वर्गीकरणे, प्रभागातील चारही नगरसेवकांमध्ये असलेला समन्वयाचा अभाव याबाबत चर्चा झडली होती.
