• Fri. Mar 6th, 2026

    Satara News : बारावीची परीक्षा, आयुष्याचा टर्निंग पॉईंट, वाढदिवस अन् दुचाकीची समोरासमोर धडक, दोन तरुणांचं होत्याचं नव्हतं, प्राण गमावला

    Satara News : बारावीची परीक्षा, आयुष्याचा टर्निंग पॉईंट, वाढदिवस अन् दुचाकीची समोरासमोर धडक, दोन तरुणांचं होत्याचं नव्हतं, प्राण गमावला

    साताऱ्यात हृदयद्रावक घटना घडली आहे. बारावीचा पेपर देवून वाढदिवसाच्या निमित्ताने खरेदीसाठी निघालेल्या तरुणाची दुचाकी समोरुन येणाऱ्याला दुचाकीला धडकली. या समोरासमोरील धडकेत दोन्ही दुचाकीवरच्या दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे साताऱ्यात हळहळ व्यक्त होत आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुधीर पाटील, सातारा : अतिघाई संकटात नेई, असं नेहमी म्हटलं जातं. वाहन चालवताना नेहमी ती सावकाश चालवावेत आणि वाहतूक नियमांचे पालन करावे, असं वारंवार आवाहन केलं जातं. पण अनेकदा त्यांचं पालन होत नाही. त्यामुळे दुर्घटना घडते आणि त्यामध्ये जीवितहानी घडते. साताऱ्यात अशीच एक दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 18 वर्षांच्या दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. संबंधित घटना ही साताऱ्यात घडली आहे. या घटनेवर जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात होते. साताऱ्यातील माण तालुक्यात हृदयद्रावक घटना घडली आहे. सातारा-पंढरपूर मार्गावर पिलीव गावच्या हद्दीत दोन मोटरसायकलींची समोरासमोर धडक होऊन दोन तरूणांचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हर्षवर्धन शिरतोडे (वय १८) आणि स्वप्नील सुळे (वय १८), अशी मृतांची नावे आहेत. वाढदिवस असल्याने मित्रांसोबत तो खरेदीसाठी निघाला होता. मात्र, वाढदिनीच काळाने त्याला हिरावून नेले.

    स्वप्नील सुळे, साईराज सुळे आणि गणेश माने या तिन्ही मित्रांनी म्हसवड (ता. माण) येथील सिद्धनाथ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या केंद्रावर सोमवारी बारावी परीक्षेचा पेपर दिला. त्या दिवशी स्वप्नील सुळे याचा वाढदिवस होता. त्यानिमित्त कपडे आणि साहित्य खरेदीसाठी तिघे मित्र एकाच मोटरसायकलवरून पिलीवकडे निघाले होते. चारचाकी वाहनाला ओव्हरटेक करीत असताना त्यांच्या आणि समोरून येणाऱ्या मोटरसायकलची समोरासमोर धडक झाली. त्यात समोरच्या गाडीवरील हर्षवर्धन शिरतोडे हा जागीच ठार झाला तर स्वप्नील सुळे याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

    अपघातात मृत्यूमुखी पडलेला हर्षवर्धन शिरतोडे हा पिलीव येथील आपल्या मावशीला भेटून मोटरसायकलवरून म्हसवडला घरी निघाला होता. मात्र, वाटेतच काळाने त्याच्यावर झडप घातली. त्यामुळे मावशी आणि भाच्याची ती अखेरची भेट ठरली. दरम्यान, अपघाती मृत्युमुळे स्वप्नील सुळे याच्यावर वाढदिवशीच अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ त्याच्या कुटुंबावर आल्याने माण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. त्याचे मित्र गणेश माने आणि साईराज सुळे यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. बारावीची परीक्षा संपल्यानंतर अकलूज येथे एमएचसीईटीची परीक्षा देण्यासाठी तिघांनी ॲडमिशनही घेतले होते.

    बारावीच्या परिक्षेचा पेपर देऊन स्वप्नीलचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्याचा प्लॅन मित्रांनी केला होता. तर कुटुंबातील एकुलता एक मुलगा म्हणून स्वप्नीलच्या वाढदिवसासाठी कुटुंबातील सदस्यही तयारी करत होते. मात्र, त्याच दिवशी सुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. या अपघाताची घटनेची नोद पिलीव (ता. माळशिरस) पोलीस ठाण्यात झाली असून हवालदार प्रविण जाधव तपास करीत आहेत.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा