म. टा. खास प्रतिनिधी, पुणे: बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नामाधिकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती असे ३१ मे २०२३ च्या शासन निर्णयानुसार केले आहे. या महाविद्यालयाच्या नावात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे स्पष्टीकरण वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने केले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती या महाविद्यालयास संलग्नित असलेल्या ५०० खाटांच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालय बारामती या संस्थेचे नाव स्व. अजित (दादा) पवार सर्वोपचार रुग्णालय, बारामती असे करण्यात आले आहे. असा शासन निर्णय 2 मार्च २०२६ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
यापूर्वी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अधिपत्याखालील अनेक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्यांना संलग्नित रुग्णालयांची नावे स्वतंत्रपणे निश्चित करण्यात आली आहेत.
उदा. १) ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई महाविद्यालयास संलग्नित असलेल्या रुग्णालयास सर जे.जे. समूह रुग्णालय, मुंबई,
२) बी.जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे संलग्नित रुग्णालयास ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे,
३) डॉ. वैशंपायन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर संलग्नित रुग्णालयास छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर
४)राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर संलग्नित रुग्णालयास छत्रपती प्रमिलाराजे स्मृती रुग्णालय, कोल्हापूर असे असल्याचेही वैद्यकीय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या ३ जानेवारी २०१३च्या शासन निर्णयान्वये बारामती येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ५०० रुग्णखाटांचे संलग्नित रुग्णालय स्थापन करण्यास मान्यता दिली होती. त्यानंतर २० जुलै २०२१ रोजीच्या शासन निर्णयानुसार १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय आयुर्वेद महाविद्यालय आणि १०० रुग्णखाटांचे आयुर्वेद रुग्णालयही सुरू करण्यात आले.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा