PMPML CNG Buses: निधी, मान्यता आणि कंपन्यांची निवड झाल्यानंतरही बसखरेदीचा प्रवास नेमका कुठे अडला, याचे स्पष्ट उत्तर पीएमपी प्रशासनाकडे नाही.
पीएमपी सीएनजी बस(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
म. टा. प्रतिनिधी, पुणे: शहरातील सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांसह पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) स्वमालकीच्या एक हजार सीएनजी बस खरेदीसाठी वर्षापूर्वी निधी दिला आहे. बस खरेदीला संचालक मंडळाने मान्यता दिली, निविदा प्रक्रिया राबवून टाटा मोटर्स आणि अशोक लेलँड या कंपन्यांची निवडही करण्यात आली . मात्र, प्रत्यक्ष खरेदी आदेश देण्याची प्रक्रिया अद्याप काही बसची पूर्ण झालेली नाही. त्यामुळे एकही बस ताफ्यात आलेली नाही.
तत्कालीन पालकमंत्री स्व. अजित पवार यांनी पीएमपीचा ताफा वाढवण्यासाठी तातडीने एक हजार बससाठी महापालिका व ‘पीएमआरडीए’ला आदेश दिले. त्यानुसार २०२५च्या सुरुवातीलाच बस खरेदीसाठी निधीही पीएमपीला वर्ग करण्यात आला. त्यानंतर निविदा प्रक्रिया सुरू झाली. स्वमालकीच्या एक हजार बस मार्च २०२६पर्यंत दाखल होतील, असे सांगण्यात आले; पण निविदेत काही त्रुटी राहिल्यामुळे या बस जुलैपर्यंत ताफ्यात दाखल होतील, अशी आश्वासने यापूर्वी दिली होती. आता मात्र बस येण्यासाठी डिसेंबर उजाडेल, असे अधिकारी सांगत आहेत.
Monsoon Tourism: पर्यटक! छे… नुसती बेशिस्त झुंड; वर्षासहलींच्या नावाखाली सह्याद्रीच्या कुशीतील पर्यटनस्थळी धुडगूस, कारवाई कधी होणार? पीएमपीच्या ताफ्यातील स्वमालकीच्या बस वाढाव्यात, यासाठी ‘ पीएमआरडीए’ ने ५०० बससाठी २५० आणि दोन्ही महापालिकांनी मिळून पाचशे बससाठी २५० कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. गेल्या एक ते दीड वर्षापासून फक्त निविदा प्रक्रियाच सुरू आहे. Pune FDA Raid :’एफडीए’ची कारवाई ; १२ हॉटेलचे परवाने निलंबित प्रवाशांचे हाल कधी थांबणार ? पुणे महानगर क्षेत्राची लोकसंख्या एक कोटीपेक्षा अधिक असताना ‘पीएमपी’कडे दोन हजार बस आहेत. गरज सहा हजारांहून अधिक बसची असल्याचे प्रशासनानेच मान्य केले आहे. परिणामी, अनेक मार्गांवर बसच्या फेऱ्या कमी आहेत. निर्णय घेण्याची क्षमता नसेल, तर कोट्यवधींचा निधी घेऊन बसण्याचा अधिकार ‘पीएमपी’ला कोणी दिला? विलंबासाठी जबाबदार अधिकाऱ्यांची नावे जाहीर करून खरेदीचे निश्चित वेळापत्रक प्रसिद्ध केले पाहिजे, अशी मागणी प्रवासी संघटना करीत आहेत. याबाबत ‘पीएमपी’च्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी बोलण्यास नकार दिला.
लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर
किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.
शैक्षणिक पात्रता किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा