• Sat. Jun 6th, 2026
    Solapur News : ‘मला मोबाईल का दिला नाही?’, 13 वर्षीय मुलाचं टोकाचं पाऊल; अख्ख्या गावाच्या डोळ्यात पाणी

    Solapur Crime News : राज्यात गुन्हेगारीसह आत्महत्येचं प्रमाण देखील वाढत चाललं आहे. अशातच सोलापुरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. या घटनेनं संपूर्ण गाव रडलं आहे.

    मोहोळ १३ वर्षीय मुलाची आत्महत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    इरफान शेख, सोलापूर : मोबाईल फोनमुळे लहान मुलांना अतिशय घाणेरडी सवय लागत चालली आहे. पालकचं आपल्या लहान मुलांना मोबाईल देत आहेत. लहान मुलांच्या हातात मोबाईल देण्याचा भयंकर ट्रेंड सुरू झाला आहे. मोबाईलच्या घाण सवयीमुळे सोलापुरात एक धक्कादायक घटना घडली आहे. मोबाईल वापरण्यास न दिल्यामुळे एका 13 वर्षीय मुलाने राहत्या घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या धक्कादायक घटनेमुळे सोलापुरात हळहळ व्यक्त होत आहे. मोहोळ तालुक्यातील पेनुर गावात ही घटना घडली आहे. ही घटना 1 मार्च रविवार रोजी घडली आहे.

    ‘अभ्यास कर, मोबाईल वापरू नको’, म्हणताच…

    मोहोळ पोलीस ठाण्यात या आत्महत्येबाबत नोंद करण्यात आली आहे. मोहोळ तालुक्यातील पेनुर गावात एक कुटुंब राहतं. आत्महत्या केलेल्या मुलाचे वडील हे शेतकरी आहेत.1 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजण्यापूर्वी घरात मुलाने ‘मला मोबाईल का दिला नाही?, असं म्हणत वाद घातला. ‘अभ्यास कर, मोबाईल वापरू नको’, असं घरच्यांनी त्याला बजावलं. आपल्याला मोबाईल दिला नाही म्हणून रागाच्या भरात तो खोलीत गेला. आपल्याला मोबाईल वापरायला का दिला नाही? म्हणून 13 वर्षीय मुलाने राहत्या घरातील पत्र्याच्या लोखंडी अँगलला साडीच्या साह्याने गळफास लावून घेतला.
    Maharashtra TimesMumbai-Pune Expresswayला नवा पर्याय, उरण-कर्जत-शिरूर महामार्गासाठी अखेर हालचाली; 1200 कोटींचा खर्च अपेक्षित

    गळफास घेत आयुष्य संपवलं

    रागाच्या भरात मुलाने आतल्या खोलीत जाऊन आतून कडी लावून घेतली. बराच वेळ झाला मुलगा काही बाहेर येईना. त्यामुळे कुटुबीयांचा संशय बळावला. कुटुंबातील सदस्यांनी लोखंडी रॉडच्या साहाय्याने कडी तोडून खोलीत प्रवेश केला असता समोर मुलाने गळफास घेतल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर मुलाला खाली उतरवण्यात आलं आणि तात्काळ पेनुर येथील खासगी रुग्णालयात दाखल केलं. मोहोळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी तपासून त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचं सांगितलं. 13 वर्षीय लेकाच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.
    Maharashtra TimesAhilyanagar Accident : मित्राला सोडून परतताना काळाची झडप, रस्ता क्रॉस करताना ट्रकने चिरडलं; बाईकवरच दोघांचा करुण अंत

    अख्खं गाव हळहळला

    आबा दत्तात्रय डोके यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात माहिती दिली असून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल नाळे करीत आहेत. 13 वर्षांच्या मुलाने मोबाईल दिला नाही म्हणून आत्महत्या केल्याच्या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. 13 वर्षांच्या मुलाच्या जाण्यानं अख्खं गाव रडलं.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा