Ahilyanagar Accident News : अहिल्यानगरमधील शेवगावमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. दोघांचा मृत्युमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
कुटुंबाचे आधारस्तंभ गेले
या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे निखिल पठाडे (वय 25) आणि विनायक शिंदे (वय 26) अशी असून ते शेवगाव तालुक्यातील वरूर बुद्रुक येथील रहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे. दोघेही तरुण मेहनती आणि कुटुंबाचा आधारस्तंभ असल्याने त्यांच्या निधनाने गावावर शोककळा पसरली आहे.
Iran vs Israel : मध्य पूर्वेतील युद्धाचा महाराष्ट्राला फटका, द्राक्ष-केळ्यांसह भाज्यांची कोट्यवधींची निर्यात ठप्प, शेतकरी हवालदिल
पुढील तपास पोलीस करत आहेत
अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची प्रचंड गर्दी जमली होती. काही काळ वाहतूक ठप्प झाली. पोलिसांनी तातडीने धाव घेऊन पंचनामा केला व परिस्थिती नियंत्रणात आणली. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी अहिल्यानगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, शहरातील वाढती वाहतूक, भरधाव ट्रक आणि निष्काळजीपणे रस्ता ओलांडणे यामुळे अपघातांची मालिका सुरूच असल्याची चर्चा नागरिकांतून व्यक्त होत आहे. वाहतुकीचे नियम पाळले असते तर दोन तरुणांचे जीव वाचले असते,अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांकडून दिली जात आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे शेवगाव तालुक्यात शोकसागर उसळला असून पुढील तपास शेवगाव पोलीस करत आहेत.
Nashik News: नाशिकमध्ये तीन महिने ‘नो एन्ट्री’, सर्व खासगी बस थांबे रद्द; 29 रस्ते व 5 उड्डाणपुलांच्या कामांमुळे निर्णय
बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय
अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील संवत्सर शिवारातील रामवाडी येथे हनुमान मंदिरासमोर रविवारी (1 मार्च) रात्रीच्या सुमारास एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी रात्री उशिरा घटनास्थळी भेट दिली आणि तपासाची चक्रे फिरवली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून, तरुणाची लोखंडी कत्ती, विटा आणि दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. संबंधित घटना घडल्यानंतर अवघ्या काही तासात पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.
